श्रोत्यांची वृत्ती ओळखणे

Verses

Holy Kural #७११
बांघवहो, तुम्ही वक्‍तृत्वाचा अभ्यास केलेला आहे.; सदभिरुची काय तेही तुम्ही जाणता; श्रोतृवृंदाचे स्वरूप नीट ओळखा, त्यांना रुचेल नि पचेल असे भाषण करा.

Tamil Transliteration
Avaiyarinadhu Aaraaindhu Solluka Sollin
Thokaiyarindha Thooimai Yavar.

Explanations
Holy Kural #७१२
वक्‍तृत्वकलाभिज्ञांनो, प्रथम श्रोत्यांची लहर नि मनोवृत्ती नीट ओळखून मगव काळजीपूर्वक विचार करून तुम्ही भाषण करीत जा.

Tamil Transliteration
Itaidherindhu Nankunarndhu Solluka Sollin
Nataidherindha Nanmai Yavar.

Explanations
Holy Kural #७१३
सभेचा रागरंग न बघता जो एकदम बोलू लागते, त्याला वक्‍तृत्वकलाकळत नाही; एकढेव नव्हे, तर त्याला काहीही कळत नाही.

Tamil Transliteration
Avaiyariyaar Sollalmer Kolpavar Sollin
Vakaiyariyaar Valladhooum Il.

Explanations
Holy Kural #७१४
शहाण्यांच्यानि पंडितांच्या सभेत शहाणपणाच्या नि पंडिताच्या गोष्‍टी कराव्या; परंतु मूर्खांच्या सभेत साधेपणाचा शुभ्र वेष धारण करावा.

Tamil Transliteration
Oliyaarmun Olliya Raadhal Veliyaarmun
Vaansudhai Vannam Kolal.

Explanations
Holy Kural #७१५
वृद्धांच्या परिषदेत पुढाकार घ्याव्याच्या नाही, असे मनात ठरवायला फारच संयम लागते. हा गुण इतर सद्‍गुणांपेक्षा शतपटींनी शोभतो.

Tamil Transliteration
Nandrendra Vatrullum Nandre Mudhuvarul
Mundhu Kilavaach Cherivu.

Explanations
Holy Kural #७१६
सुज्ञांसमोर जो अपशब्द बोलतो तो स्वतःचे नुकसान करतो. आपण धर्ममार्गापासून च्युत झालो असे मनात येऊन नंतर त्याला पस्तावावे लागेल.

Tamil Transliteration
Aatrin Nilaidhalarn Thatre Viyanpulam
Etrunarvaar Munnar Izhukku.

Explanations
Holy Kural #७१७
गुणी विचक्षणांच्या सभेत विद्वानाची विद्या खूलून दिसते.

Tamil Transliteration
Katrarindhaar Kalvi Vilangum Kasatarach
Choldheridhal Vallaar Akaththu.

Explanations
Holy Kural #७१८
सुज्ञ व जाणत्या लोकांना उत्तम सल्ला देणे म्हणजे जिवंत वृक्षांच्या मुळांना पाणी घालण्य़ाप्रमाणे आहे.

Tamil Transliteration
Unarva Thutaiyaarmun Sollal Valarvadhan
Paaththiyul Neersorin Thatru.

Explanations
Holy Kural #७१९
प्रतिष्‍ठित व सुज्ञ लोकांनी आपले भाषण मोठया आवडीने ऐकावे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी चुकूनही मूर्खांच्या सभेत भाषण करू नये.

Tamil Transliteration
Pullavaiyul Pochchaandhum Sollarka Nallavaiyul
Nankusalach Chollu Vaar.

Explanations
Holy Kural #७२०
जे लोक तुमचे उणे पाहण्यासाठी अधीर आहेत, अशांच्या समोर व्याख्यान देणे म्हणजे गाटारावर अमृतवर्षाव करण्याप्रमाणे आहे.

Tamil Transliteration
Anganaththul Ukka Amizhdhatraal Thanganaththaar
Allaarmun Kotti Kolal.

Explanations
🡱