सभेतील आत्मविश्‍वास

Verses

Holy Kural #७२१
जे वद्‍तृत्वकलाभिज्ञ आहेत, जे रस जाणतात, सदभिरुची ओळखतात, ते आपले म्हणणे व्यवस्थि रीतीने कसे मांडावे ते जाणतात. सूज्ञांच्या सभेत त्या>ची कधी फ्जिती व्हायची नाही.

Tamil Transliteration
Vakaiyarindhu Vallavai Vaaisoraar Sollin
Thokaiyarindha Thooimai Yavar.

Explanations
Holy Kural #७२२
विद्वानांच्या सभेतही जो आपली निश्‍चित मते निर्भयपणे मांडतो, त्यांचे समर्थन करू शकतो, तो विद्वानांचा मुकुटमणी होय.

Tamil Transliteration
Katraarul Katraar Enappatuvar Katraarmun
Katra Selachchollu Vaar.

Explanations
Holy Kural #७२३
समरांगणात मृत्यूलाही आव्हान देणारे अनेक आढळतात; परंतु न गांगरता सभेल तोंड देणारा दुर्मिल.

Tamil Transliteration
Pakaiyakaththuch Chaavaar Eliyar Ariyar
Avaiyakaththu Anjaa Thavar.

Explanations
Holy Kural #७२४
ज्यात तू तज्ज्ञ आहेस, जे तू आपलेस केले आहेस, ते ठामपणे विद्वानांसमोर मांड; परंतु ज्याचे तुला ज्ञान नाही, ज्यात तू पारंगत नाहीस, ते सारे त्यांच्यापासून शीक.

Tamil Transliteration
Katraarmun Katra Selachchollith Thaamkatra
Mikkaarul Mikka Kolal.

Explanations
Holy Kural #७२५
सभेत निर्भयपणे बोलता यावे म्हणून तर्कशास्त्र नि न्यायशास्त्र यांचा अभ्यास कर.

Tamil Transliteration
Aatrin Alavarindhu Karka Avaiyanjaa
Maatrang Kotuththar Poruttu.

Explanations
Holy Kural #७२६
ज्या तरवारीत पाणी नाही, ती काय चाटायची आहे? पंडितांच्या सभेत घाबरणान्याला ग्रंथांचा काय फायदा?

Tamil Transliteration
Vaaloten Vankannar Allaarkku Nooloten
Nunnavai Anju Pavarkku.

Explanations
Holy Kural #७२७
षंढाच्या हातातील तरवारीप्रमाणे पंडितसभेत घाबरणान्यांचे ज्ञान होय.

Tamil Transliteration
Pakaiyakaththup Petikai Olvaal Avaiyakaththu
Anju Mavankatra Nool.

Explanations
Holy Kural #७२८
विद्वानांच्या सभेत आपले म्हणणे जर त्यांच्या गळी उतरवता आले नाही तर आपले ज्ञान फोल होय.

Tamil Transliteration
Pallavai Katrum Payamilare Nallavaiyul
Nanku Selachchollaa Thaar.

Explanations
Holy Kural #७२९
विद्वानांच्या सभेत गलितधैर्य होणान्यांची विद्या केवढीही असली, तरी अडाण्यापेक्षाही त्यांची योग्यता कमी लेखली जाईल.

Tamil Transliteration
Kallaa Thavarin Kataiyenpa Katrarindhum
Nallaa Ravaiyanju Vaar.

Explanations
Holy Kural #७३०
सभेत गांगरणारे आणि स्वतःचे विचार ज्यांना नीट विवरून सांगता येत नाहीत, ते जिवंत असले तरी मृतवतच होत

Tamil Transliteration
Ulareninum Illaarotu Oppar Kalananjik
Katra Selachchollaa Thaar.

Explanations
🡱