उत्कठेने वाट पाडून दोळे निस्तेज हॊणे
Verses
हे डोळे आज का बरे करकूर करीत आहेत?यांनीच तो प्रियकर मला प्रथम दाखविला आणि न शांत होणारे दुःख त्यांनी माझ्या नशिबी आणले.
Tamil Transliteration
Kandhaam Kaluzhva Thevankolo Thantaanoi
Thaamkaatta Yaamkan Tadhu.
काईएक विचार न करता या डोळयांनी प्रियकराला प्रथम उतावीळपणाने पाहिले. त्या मूर्खपणाचे परिणाम आता मुकाटयाने सोसायचे सोडून ते रडतात कशाला?
Tamil Transliteration
Therindhunaraa Nokkiya Unkan Parindhunaraap
Paidhal Uzhappadhu Evan?.
त्या दिवशी या डोळयांनी आपण होऊन त्यांच्याकडे पोट भरून पाहिले आणि आज तेच रडत आहेत! असे करून ते स्वतःला हास्यास्पद मात्र करून घेत आहेत.
Tamil Transliteration
Kadhumenath Thaanokkith Thaame Kaluzhum
Ithunakath Thakka Thutaiththu.
माझे डोळे आत कोरडे आहेत. अश्रूंचा साठा संपला; परंतु अपरिहर्य शोकाची पुंजी शिल्लक आहे.
Tamil Transliteration
Peyalaatraa Neerulandha Unkan Uyalaatraa
Uyvilnoi Enkan Niruththu.
समुद्राहूनही अपार असे दुःख नि मनस्ताप मला देऊन हे डोळे आता स्वतःच दुःखाने झुरत आहेत, ते झोपू शकत नाहीत.
Tamil Transliteration
Patalaatraa Paidhal Uzhakkum Katalaatraak
Kaamanoi Seydhaen Kan.
ज्या डोळयांनी मला रडविले, तेच आता स्वतः रदत आहेत. सूड जगवला गेला असे मनात वाटले.
Tamil Transliteration
Oo Inidhe Emakkinnoi Seydhakan
Thaaam Itharpat Tadhu.
त्या दिवशी प्रेमार्थ होऊन बुभुक्षियाप्रमाणे या डोळ्यांनी त्याच्याकडे टक लावून पाहिले; त्याच्य रमणीय मूर्तीवर ते लुब्द झाले होते. आता म्हणावे रडा, झुरून मरा.
Tamil Transliteration
Uzhandhuzhan Thulneer Aruka Vizhaindhizhaindhu
Venti Avarkkanta Kan.
आपणाला प्रेम मिळाले ताही तरीही प्रेम करणारे या जगात असतात. तो दिसत नसन्यामुळे ज्यांना विश्रांती माहीत नाही, ते माझे डोळे बघा.
Tamil Transliteration
Penaadhu Pettaar Ularmanno Matravark
Kaanaadhu Amaivila Kan.
तो दूर असला म्हणजे डोळयांना झोप माहीत नसते; जवळ असला म्हणजेही ते मिटत नाहीत. अखंड दुःखच त्यांच्या नशिबी आहे.
Tamil Transliteration
Vaaraakkaal Thunjaa Varindhunjaa Aayitai
Aaragnar Utrana Kan.
माणसाचे डोळेच जेव्हा सारे जाहीर करू लागतात तेव्हा गुप्त गोष्ट लोकांना कळल्याशिवाय कशी राहील? माझे डोळे हेच करीत आहेत.
Tamil Transliteration
Maraiperal Ooraarkku Aridhandraal Empol
Araiparai Kannaar Akaththu.