पात्रता
Verses
स्वतःची पात्रता वाढावी असे ज्यांना वाटते, जे स्वकर्तव्य जाणतात त्यांना जे जे चांगले ते ते करावेसे वाटते.
Tamil Transliteration
Katanenpa Nallavai Ellaam Katanarindhu
Saandraanmai Merkol Pavarkku.
पात्रता चारित्र्याच्या पावित्र्यात असते; इतर, गोष्टींनी पात्रता वाढत नसते.
Tamil Transliteration
Kunanalam Saandror Nalane Piranalam
Ennalaththu Ulladhooum Andru.
विनय, प्रसन्न दयाळुत्व, दुसन्याचे दोष क्षमणे, सर्वांवर प्रेम आणि सत्यनिष्ठा हे थोर चारित्र्याच्या इमारतीचे पाच खांब आहेत.
Tamil Transliteration
Anpunaan Oppuravu Kannottam Vaaimaiyotu
Aindhusaal Oondriya Thoon.
साधूचा मोठा गुण म्हणजे अहिंसा; आणि ज्याची थोर योग्यता असते तो निंदेचे शब्द कधी बोलत नाही.
Tamil Transliteration
Kollaa Nalaththadhu Nonmai Pirardheemai
Sollaa Nalaththadhu Saalpu.
नम्रता हेच बलवंताचेही बळ; मोठयांचे शत्रूविरुद्ध हेच संरक्षक कवच असते.
Tamil Transliteration
Aatruvaar Aatral Panidhal Adhusaandror
Maatraarai Maatrum Patai.
योग्यता पशी पारखावी? आपल्याहून क्षुद्र असणान्यांचया ठिकाणी श्रेष्ठत्व दिसून आले तर तेही आनंदाने कबूल करणे म्हणजे पात्रता, म्हणजे योग्यता.
Tamil Transliteration
Saalpirkuk Kattalai Yaadhenin Tholvi
Thulaiyallaar Kannum Kolal.
अपाय करणान्यावर उपकार न करील, वाईट इच्छिणान्याचेही भले न चिंतील, तर मग ठोरांचे थोरपण ते कोठे उरले?
Tamil Transliteration
Innaasey Thaarkkum Iniyave Seyyaakkaal
Enna Payaththadho Saalpu.
शीलाची संपत्ती भरपूर असेल तर दारिद्र्य हे काही दूषण नाही.
Tamil Transliteration
Inmai Oruvarku Ilivandru Saalpennum
Thinmai Un Taakap Perin.
आणीबाणीच्या प्रसंगीही जो सत्वच्युत होत नाही तोच थोर योग्यतेचा.
Tamil Transliteration
Oozhi Peyarinum Thaampeyaraar Saandraanmaikku
Aazhi Enappatu Vaar.
मोठी माणसाही मोठेपणापासून च्युत होऊ लागली तर पृथ्वीला मानवांचा भार करवणार नाही.
Tamil Transliteration
Saandravar Saandraanmai Kundrin Irunilandhaan
Thaangaadhu Manno Porai.