मोठेपणा

Verses

Holy Kural #९७१
उदात कर्माची महत्वाकांक्षाअसणे म्हणजे मोठेपणा होय; मला त्या उदात्ताची जरूरी नाही, असे म्हणजे क्षुद्रता होय.

Tamil Transliteration
Olioruvarku Ulla Verukkai Ilioruvarku
Aqdhirandhu Vaazhdhum Enal.

Explanations
Holy Kural #९७२
सारी माणसे एकाच पद्धतीने जन्मतात; परंतु जगतात निरनिराळया रीतीने त्यांची कीर्तीही वेगवेगळी होते.

Tamil Transliteration
Pirappokkum Ellaa Uyirkkum Sirappovvaa
Seydhozhil Vetrumai Yaan.

Explanations
Holy Kural #९७३
मोठया कुलात जन्मून मन मोठे नसेल तर ते मोठे नव्हेन; क्षुद्र कुलात जन्मून मन क्षुद्र नसेल तर ते क्षुद्र नव्हेत.

Tamil Transliteration
Melirundhum Melallaar Melallar Keezhirundhum
Keezhallaar Keezhal Lavar.

Explanations
Holy Kural #९७४
स्त्रीच्या पातिव्रत्याप्रमाणे स्वतःशी सत्यनिष्‍ठ असणान्यांनाच मोठेपणा मिळवता येतो.

Tamil Transliteration
Orumai Makalire Polap Perumaiyum
Thannaiththaan Kontozhukin Untu.

Explanations
Holy Kural #९७५
अशक्य गोष्‍टी योग्य साधनांनी शक्य करणे, हा योजकत्वाचा आणि चिकाटीचा गुण मोठयांच्या ठिकाणी असतो.

Tamil Transliteration
Perumai Yutaiyavar Aatruvaar Aatrin
Arumai Utaiya Seyal.

Explanations
Holy Kural #९७६
क्षुद्र वृत्तीच्या लोकांना पूज्यांना पूज्य मानून त्यांची सदिच्छा नि कृपा मिळवावी असे कधीच वाटत नाही.

Tamil Transliteration
Siriyaar Unarchchiyul Illai Periyaaraip
Penikkol Vemennum Nokku.

Explanations
Holy Kural #९७७
क्षुद्रांना सुदैवाने जर ऐश्वर्य प्राप्‍त झाले तर त्यांच्या घमेंडीला सीमा उरत नाही.

Tamil Transliteration
Irappe Purindha Thozhitraam Sirappundhaan
Seeral Lavarkan Patin.

Explanations
Holy Kural #९७८
मोठेपणा विजयी असतो; तेथे ढोंग नसते; क्षुद्र लोक आपले गुण जगासमोर मांडीत सुटतात.

Tamil Transliteration
Paniyumaam Endrum Perumai Sirumai
Aniyumaam Thannai Viyandhu.

Explanations
Holy Kural #९७९
जो मोठा आहे तो सर्वांजवळ नम्रतेने वागतो. क्षुद्र लोक उद्धटपणाचे आगर असतात.

Tamil Transliteration
Perumai Perumidham Inmai Sirumai
Perumidham Oorndhu Vital.

Explanations
Holy Kural #९८०
मोठेपण्या दुसन्यांच्या दोषांवर पांघरूण घालतो; क्षुद्रता परनिंदेशिवाय कधी बोलतच नाही.

Tamil Transliteration
Atram Maraikkum Perumai Sirumaidhaan
Kutrame Koori Vitum.

Explanations
🡱