अपायकारक मैत्री
Verses
जणू तुम्हांला खाऊन टाकतील इतके प्रेम जे तुमच्यावर करतात, मैत्री जोडण्याच्या वेळेपेक्षा तोडण्याच्या वेळेसच जे अधिक गोडीगुलाबी दाखवतात, अशांच्या हृदयात प्रेमाचा लवलेशही नसतो.
Tamil Transliteration
Parukuvaar Polinum Panpilaar Kenmai
Perukalir Kundral Inidhu.
फायद्यासाठी जे खुशामत करतात, फायदा नाही असे दिसताच जे खुशाल सोडून जातात, अशा नीचांची मैत्री लाभली काय, न लाभली काय, सारखीच.
Tamil Transliteration
Urinnattu Arinoruum Oppilaar Kenmai
Perinum Izhappinum En?.
मैत्रीमुळे काय फायदा होईल याचा जे हिशेव करीत बसतात ते वेश्या व चोर यांच्या वर्गांतीलच समजावे.
Tamil Transliteration
Uruvadhu Seerdhookkum Natpum Peruvadhu
Kolvaarum Kalvarum Ner.
वरती बसणारास फेकून रणातून पळून जाणान्या घोडयाप्रमाणे काही लोक असतात; असे मित्र मिळण्यापेक्षा नसलेल बरे.
Tamil Transliteration
Amarakaththu Aatrarukkum Kallaamaa Annaar
Thamarin Thanimai Thalai.
विश्वास टाकणान्या मित्रास संकटकाळी आणी त्याला मदतीची अपेक्षा असताना जे सोडून जातात, अशा नीचांची मैत्री नसलेली बरी.
Tamil Transliteration
Seydhemanj Chaaraach Chiriyavar Punkenmai
Eydhalin Eydhaamai Nandru.
मूर्खांशी गृढ मैत्री असण्यापेक्षा शहाण्यांचे शत्रूत्वही शतपटींनी बरे.
Tamil Transliteration
Pedhai Perungezheei Natpin Arivutaiyaar
Edhinmai Koti Urum.
खुशामते आणि चलती आहे तोवर मैत्री करणारे, अशांपेक्षा शत्रूचा द्वेषही पुरवला.
Tamil Transliteration
Nakaivakaiya Raakiya Natpin Pakaivaraal
Paththatuththa Koti Urum.
एखाद्या कामात तू जिवापाड मेहनत करीत असता जे तुझ्या मार्गात अडथळे आणतात, अशांजवळ एक शब्दही न बोलता दूर जाणे हे चांगेल.
Tamil Transliteration
Ollum Karumam Utatru Pavarkenmai
Sollaataar Sora Vital.
ज्यांच्या वाणीत आणि करणीत मेळ नाही, अशांजवळ मैत्री स्वप्नातही मनात आणाल तरी नुकसान होईल.
Tamil Transliteration
Kanavinum Innaadhu Manno Vinaiveru
Solveru Pattaar Thotarpu.
तुम्ही एकटे असताना तुमच्याजवळ गोड बोलतात; परंतु सभेत जे तुमची टर उडवतात, उपहास करतात, अशांजवळ जरासुद्धा जाऊ नकोस.
Tamil Transliteration
Enaiththum Kurukudhal Ompal Manaikkezheei
Mandril Pazhippaar Thotarpu.