जीवश्‍च कंठश्‍च

Verses

Holy Kural #८०१
आपल्या मित्राने आपल्याशी कितीही स्वातंत्र्य घेतले तरी जर आपण रागवणार नसू तरच ती खरी मैत्री.

Tamil Transliteration
Pazhaimai Enappatuvadhu Yaadhenin Yaadhum
Kizhamaiyaik Keezhndhitaa Natpu.

Explanations
Holy Kural #८०२
मोकळेपणाने नि प्रेमळपणाने परस्परांजवळ वागणे उआत मैत्रीचे सर्वस्व आहे. अशा अतिपरिचयाचा थोरांना कधी राग येत नाही.

Tamil Transliteration
Natpir Kuruppuk Kezhudhakaimai Matradharku
Uppaadhal Saandror Katan.

Explanations
Holy Kural #८०३
तुमची मैत्री फारा दिवसांची असेल; परंतु ती जर मित्राला मोकळीक देण्यार नसल, स्वातंत्र्याची सवलत देणार नसेल, स्वातंत्र्याची सवलत देणार नसेल, तर ती काय कामाची?

Tamil Transliteration
Pazhakiya Natpevan Seyyung Kezhudhakaimai
Seydhaangu Amaiyaak Katai.

Explanations
Holy Kural #८०४
परस्परांच्या दृढ परिचयावर विसंबून एकमेकांस न विचारताही मित्र जेव्हा एखादी गोष्‍ट करतो, तेव्हा जे प्रेमल हृदयाचे असतात, त्यांना त्यात प्रेमच दिसते.

Tamil Transliteration
Vizhaidhakaiyaan Venti Iruppar Kezhudhakaiyaar
Kelaadhu Nattaar Seyin.

Explanations
Holy Kural #८०५
मित्राने केलेल्या एखाद्या गोष्‍टीमुळे, समजा तुम्हांला दुःख झाले, तरी त्याची एखरूपता, अभिन्नता, आपल्या मित्राला यामुळे दुःख होईल ही त्याला नसलेली कल्पना, इत्यादी गोष्‍टी मनात आणाव्या.

Tamil Transliteration
Pedhaimai Ondro Perungizhamai Endrunarka
Nodhakka Nattaar Seyin.

Explanations
Holy Kural #८०६
मित्र तुमच्या नाशाला कारणीभूत झाला तरीही तुम्ही जर खरे मित्र असाल तर त्या हृदयाच्या मित्रास टाकणार नाही.

Tamil Transliteration
Ellaikkan Nindraar Thuravaar Tholaivitaththum
Thollaikkan Nindraar Thotarpu.

Explanations
Holy Kural #८०७
ज्याने मनापासून कित्येक दिवस प्रेम केले, त्याचे प्रेम, मित्राने वरचेवर जरी नुकसानीत आणले तरी कमी होत नाही.

Tamil Transliteration
Azhivandha Seyyinum Anparaar Anpin
Vazhivandha Kenmai Yavar.

Explanations
Holy Kural #८०८
आपल्या खन्या मित्रासंबंधी कोणी कितीही कागळया केल्या तरी जो ऐकत नाही, त्याला तो मित्रच जेव्हा उपाय करतो, तेव्हाही आनंदच होतो. (कारण मित्राला क्षमा करून आपली गाढ मैत्री दाखवायला प्रसंग मिळतो)

Tamil Transliteration
Kelizhukkam Kelaak Kezhudhakaimai Vallaarkku
Naalizhukkam Nattaar Seyin.

Explanations
Holy Kural #८०९
जो दुसन्यावर अविचल प्रेम करतो, त्याच्यावर सारे जग प्रेम करते.

Tamil Transliteration
Ketaaa Vazhivandha Kenmaiyaar Kenmai
Vitaaar Vizhaiyum Ulaku.

Explanations
Holy Kural #८१०
आपल्या जुन्या मित्रांबरचे ज्याचे प्रेम बदलत नाही, त्याच्याकडे शत्रूसुद्धा प्रेमाने पाहतील.

Tamil Transliteration
Vizhaiyaar Vizhaiyap Patupa Pazhaiyaarkan
Panpin Thalaippiriyaa Thaar.

Explanations
🡱