सत्याचा साक्षात्कार
Verses
सारभूत वस्तू सोडून असाराचा स्वीकार करणे म्हणजे केवढा मोह! त्यामुळे जीव पुनःपुन्हा या दुःखमय संसारात पडतो.
Tamil Transliteration
Porulalla Vatraip Porulendru Unarum
Marulaanaam Maanaap Pirappu.
जो मोहनिर्मुक्त झाला, त्याची दृष्टी निर्मल झाली. अज्ञानांधकार त्याला घेरीत नाही; आनंद त्याच्याजवल येतो.
Tamil Transliteration
Irulneengi Inpam Payakkum Marulneengi
Maasaru Kaatchi Yavarkku.
ज्याचे संधय फिटले, ज्याला सत्याचा साक्षात्कार झाला, त्याला पृथ्वीहून स्वर्ग जवळ असतो.
Tamil Transliteration
Aiyaththin Neengith Thelindhaarkku Vaiyaththin
Vaanam Naniya Thutaiththu.
मनुष्यजन्म मिळूनही जर सत्याचा साक्षात्कार करूण घेणार नसाल, तर कोणते हित साधलेत?
Tamil Transliteration
Aiyunarvu Eydhiyak Kannum Payamindre
Meyyunarvu Illaa Thavarkku.
कोणतीही वस्तू असो; तिच्यासंबंधी सारासार विवेक करणे यालाच प्रज्ञत्व म्हणतात, शहाणपण म्हणतात.
Tamil Transliteration
Epporul Eththanmaith Thaayinum Apporul
Meypporul Kaanpadhu Arivu.
खोल विचात करून ज्याने सत्याची अनुभूती घेतलीतो अशा मार्गाने जाईल की जेणेकरून जन्म-मरणाची यातायात पुनश्च पाठीस लगणार नाही.
Tamil Transliteration
Katreentu Meypporul Kantaar Thalaippatuvar
Matreentu Vaaraa Neri.
सत्याचे चिंतन करून ज्यांनी ते मिळविले त्यांना 'पुनरपि जननं; पुनरपि मरणं' चा विचार करायला नको.
Tamil Transliteration
Orththullam Ulladhu Unarin Orudhalaiyaap
Perththulla Ventaa Pirappu.
जन्म-मरणाच्या फेन्यात पडण्याचा मूर्खपणा होऊ नये म्हणूण सत्याच्या नि पूर्णाच्या प्राप्तीसाठी जो प्रयत्न करतो, तोच खरा प्रज्ञावंत.
Tamil Transliteration
Pirappennum Pedhaimai Neengach Chirappennum
Semporul Kaanpadhu Arivu.
स्वोद्धाराचे मार्ग ज्याला वर्णपणे अवगत आहेत, जो सर्व प्रकारची आसक्ती जिंकून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याला ज्या पापांची फळे तो भोगीत असतो, ती प्रारब्धप्राप्त कर्मेही सोडून जातात; त्यांच्यापासून तो मुक्त होतो.
Tamil Transliteration
Saarpunarndhu Saarpu Ketaozhukin Matrazhiththuch
Chaardharaa Saardharu Noi.
काम, क्रोध, मोह ज्याने जिंकले, त्याच्या सर्व दुःकांचो निवृत्तो जालो.
Tamil Transliteration
Kaamam Vekuli Mayakkam Ivaimundran
Naamam Ketakketum Noi.