वारांगना
Verses
ज्या स्त्रिया प्रेमासाठी नव्हे, तर पैशासाठी म्हणून परपुरुषाची इच्छा करतात, त्यांच्या मोहक लीला दुःखाकडे नेतील.
Tamil Transliteration
Anpin Vizhaiyaar Porulvizhaiyum Aaidhotiyaar
Insol Izhukkuth Tharum.
वरपांगी प्रेम दाखवून स्वार्थावर ज्यांची दृष्टी असते, अशा स्त्रियांचे मार्ग नीट पाहा व चार पावले दूर राहा.
Tamil Transliteration
Payandhookkip Panpuraikkum Panpin Makalir
Nayandhookki Nallaa Vital.
प्रियकराला आलिंगन देताना वेश्या प्रेम दाखविते; परंतु प्रेतालाच आपण कवटाळीत आहोत असे ती मनात समजते.
Tamil Transliteration
Porutpentir Poimmai Muyakkam Iruttaraiyil
Edhil Pinandhazheei Atru.
निर्मल कर्मांची आवड असणारे वेश्येच्या स्पर्शाने स्वतःला अपवित्र करीत नसतात.
Tamil Transliteration
Porutporulaar Punnalan Thoyaar Arutporul
Aayum Arivi Navar.
गाढी विद्वत्ता नि विवेक ज्याच्याजवळ आहे, असा पुरुष जिचे सौंदर्य सर्वांसाठी आहे अशा वेश्येच्या स्पर्शाने स्वतःला कलंक लावून घेणार नाही.
Tamil Transliteration
Podhunalaththaar Punnalam Thoyaar Madhinalaththin
Maanta Arivi Navar.
स्वहितदक्ष मनुष्य आपल्या सौंदर्याची विक्री करणान्या वेश्येच्या हाताला अपर्श करीत नाही.
Tamil Transliteration
Thannalam Paarippaar Thoyaar Thakaiserukkip
Punnalam Paarippaar Thol.
फुलपाखरी वृत्तीचे उथळ लोकच शरीराने कवटाळणान्या, परंतु मन अन्यत्र असणान्या स्त्रियांच्या पाठोपाठ जातात.
Tamil Transliteration
Nirainenjam Illavar Thoivaar Piranenjir
Penip Punarpavar Thol.
धूर्त व मायावी स्त्रियांची आलिंगने फसव्या अप्सरांच्या आलिंगनांप्रमाणे मूर्खांनाच मोहक वाटतात.
Tamil Transliteration
Aayum Arivinar Allaarkku Anangenpa
Maaya Makalir Muyakku.
शृंगारसाज केलेल्या वेश्येचे मृदू बाहू म्हणजे नरकाची गार्ता; नीच लोकच या गर्तेत पडून सडतात.
Tamil Transliteration
Varaivilaa Maanizhaiyaar Mendhol Puraiyilaap
Pooriyarkal Aazhum Alaru.
दैवाची अवकृपा असणारे लोकच दोन मने असणान्या वेश्या, मद्य आणि द्यूत यांत आनंद मानतात.
Tamil Transliteration
920 Irumanap Pentirum Kallum Kavarum
Thiruneekkap Pattaar Thotarpu.