प्रेमकलहातील गोडी

Verses

Holy Kural #१३२१
त्याचा काही दोष नसला तरी प्रेमकलहात तो जेव्हा माझी समजूत घालू लागतो तेव्हा तो फारच सुंदर दिसतो. असे सौंदर्य एरवी समजून आले नसते.

Tamil Transliteration
Illai Thavaravarkku Aayinum Ootudhal
Valladhu Avaralikku Maaru.

Explanations
Holy Kural #१३२२
प्रियकराच्या कोमल भावनांना जरी थांबावे लागले तरी या प्रेमकलहात एकमेमांना जे बारीक चिमटे आम्ही घेतले, त्यांतली गोडी निराळीच होती.

Tamil Transliteration
Ootalin Thondrum Sirudhuni Nallali
Vaatinum Paatu Perum.

Explanations
Holy Kural #१३२३
प्रियकर व आपण मनाने जर खरोखर एकरूप असू तर ज्या जमिनीवरून पाणी वाहते, त्या जमिनीची नि पाण्याची जशी समरसता असते तशीच आपलीही असेल. आणि असे असल्यावर प्रेमकलहासारखा स्वर्ग नाही

Tamil Transliteration
Pulaththalin Puththelnaatu Unto Nilaththotu
Neeriyain Thannaar Akaththu.

Explanations
Holy Kural #१३२४
प्रियकराजवळ माझे जे भांडण होते, त्यानेच माझ्या हृदयातील बळकट किल्लेकोट ढासळतात.

Tamil Transliteration
Pulli Vitaaap Pulaviyul Thondrumen
Ullam Utaikkum Patai.

Explanations
Holy Kural #१३२५
जरी आपण निर्दोष असलो तरी प्रियेने रागावून मिठी सोडून बाहू दूर घेणे यात एकप्रकारच आनंद असतो.

Tamil Transliteration
Thavarilar Aayinum Thaamveezhvaar Mendrol
Akaralin Aangon Rutaiththu.

Explanations
Holy Kural #१३२६
भोजनापेक्षा पचन अधिक गोड आहे; त्याप्रमाणेच आलिंगनापेक्षा प्रेमकलहच अधिक मधुर आहे.

Tamil Transliteration
Unalinum Untadhu Aralinidhu Kaamam
Punardhalin Ootal Inidhu.

Explanations
Holy Kural #१३२७
प्रेमाच्या कलहात जो प्रथम शरण जातो तोच गिकतो. गोडीगुलावी जेव्हा होते तेव्हायाचा प्रत्यय येतो.

Tamil Transliteration
Ootalil Thotravar Vendraar Adhumannum
Kootalir Kaanap Patum.

Explanations
Holy Kural #१३२८
थोडा वेळ क्रोधाचा आविर्भाव अणून आमच्या आलिंगनाच्या आनंदाला ती चव आणते.

Tamil Transliteration
Ootip Perukuvam Kollo Nudhalveyarppak
Kootalil Thondriya Uppu.

Explanations
Holy Kural #१३२९
तिच्या आठया, तिचे रागावून बोलणे, मला आणखी थोडे अतुभवू दे; फक्‍त एकच प्रार्थना की या रात्रीने जरा दीर्ध व्हावे.

Tamil Transliteration
Ootuka Manno Oliyizhai Yaamirappa
Neetuka Manno Iraa.

Explanations
Holy Kural #१३३०
प्रेमकलह म्हणजे प्रेमातील गोडी, प्रेमातील शोभा आणि त्या आनंदातील परमानंद म्हणजे त्या गोडीतील परम गोडी म्हणजे मागून मिळणारे आलिंगन होय.

Tamil Transliteration
Ootudhal Kaamaththirku Inpam Adharkinpam
Kooti Muyangap Perin.

Explanations
🡱