प्रेम
Verses
प्रेमाचे दरवाजे बंद करणारा आडसर कोठे आहे? परस्परांवर प्रेम करणान्यांच्या डोळचांत जमणारे आश्रू सान्या जगाला प्रेमाचे अस्तित्व जाहीर करीत असतात.
Tamil Transliteration
Anpirkum Unto Ataikkundhaazh Aarvalar
Punkaneer Poosal Tharum.
प्रेम न कर्णारे केवळ स्वतःपुरते जगतात; परंतु प्रेम करणारे स्वतःची हाडेही दुसन्यांच्या साहाय्यासाठी देऊन टाकतील
Tamil Transliteration
Anpilaar Ellaam Thamakkuriyar Anputaiyaar
Enpum Uriyar Pirarkku.
प्रेमाची माधुरी पुन्हा चाखायला मिळावी म्हणूण्या अस्थिचर्ममय पिजन्यात बद्ध व्हाअयला आत्मा पुन्हा तयार झाला, असे ते म्हणतात.
Tamil Transliteration
Anpotu Iyaindha Vazhakkenpa Aaruyirkku
Enpotu Iyaindha Thotarpu.
प्रेमामुळे सान्या मानवजातीबद्दल आपल्याला ममता बाटते, प्रेमामुळे आपण कोमल बनतो आणि हृदयाच्या कोमळतेतूनच मैत्रीचा अमोल ठेवा जन्माला येतो.
Tamil Transliteration
Anpu Eenum Aarvam Utaimai Adhueenum
Nanpu Ennum Naataach Chirappu.
गतकाळतील प्रेमळ कोमळपणाचे देवाने दिलेले बक्षीस म्हणजेच थोरामोठचांचे मिळणारे मंगल आशीर्वाद होत.
Tamil Transliteration
Anputru Amarndha Vazhakkenpa Vaiyakaththu
Inputraar Eydhum Sirappu.
सद्गुणी लोकांविषयीच फक्त प्रेम दाखवावे, असे म्हणणारे मूर्खाहेत. कारण दुष्टांपासूनही बचाव करणारा प्रेम हाच एक खरा मित्र आहे.
Tamil Transliteration
Araththirke Anpusaar Penpa Ariyaar
Maraththirkum Aqdhe Thunai.
केवल मांसमय प्राण्यास (चरबीयुक्त प्राण्यास) सूर्य कसा जाळतो ते पाहा. त्याप्रमाणे जो प्रेम करणार नाही, त्याला सदाचार जाळील.
Tamil Transliteration
Enpi Ladhanai Veyilpolak Kaayume
Anpi Ladhanai Aram.
प्रेम माहीत नसणान्याचे हृदय पाहा. वाळवंटातील सुकलेल्या खोडास जेव्हा अंकुर फुटतील, तेव्हाच अशा माणसास भाग्य म्हणजे काय, ते कळेल.
Tamil Transliteration
Anpakath Thillaa Uyirvaazhkkai Vanpaarkan
Vatral Marandhalirth Thatru.
प्रेम हे हृदयाचे नि जीवनाचे भूषण आहे. प्रेम नसेल तर बाहेरचे सौन्दर्य काय कामाचे?
Tamil Transliteration
Puraththurup Pellaam Evanseyyum Yaakkai
Akaththuruppu Anpi Lavarkku.
प्रेम म्हणजे जीवनाचे जीवन. ज्याच्याजवळ प्रेम नाही तो केवल अस्थिचर्ममय सांगाडा होय.
Tamil Transliteration
Anpin Vazhiyadhu Uyirnilai Aqdhilaarkku
Enpudhol Porththa Utampu.