संतती

Verses

Holy Kural #६१
शहाणी व हुशार मुले याच्यासारखे सुख नाही.

Tamil Transliteration
Perumavatrul Yaamarivadhu Illai Arivarindha
Makkatperu Alla Pira.

Explanations
Holy Kural #६२
ज्याची मुलेबाळे धुतल्या तांदळाप्रमाणे निर्दोष आहेत, त्याला सात जन्मांत दुःख नाही, त्याला सात जन्मांत अशुभ शिवणार नाही.

Tamil Transliteration
Ezhupirappum Theeyavai Theentaa Pazhipirangaap
Panputai Makkat Perin.

Explanations
Holy Kural #६३
मुलेबाळे हीच माणसाची खरी संपत्ती. मुलेबाळे स्वतःच्या कृत्यांनी जे पुण्य मिळवतील, ते आईबापांना लाभत असते.

Tamil Transliteration
Thamporul Enpadham Makkal Avarporul
Thamdham Vinaiyaan Varum.

Explanations
Holy Kural #६४
मुलाच्या कोवळचा हातांनी इकडे तिकडे विखुरलेले अन्न अमृताहूनही गोड असते.

Tamil Transliteration
Amizhdhinum Aatra Inidhedham Makkal
Sirukai Alaaviya Koozh.

Explanations
Holy Kural #६५
मुलाचा स्पर्श हे शरीराचे सुख आहे, बोबडे बोल हे कानांचे सुख आहे.

Tamil Transliteration
Makkalmey Theental Utarkinpam Matru Avar
Sorkettal Inpam Sevikku.

Explanations
Holy Kural #६६
ज्यांनी आपल्या लहानग्यांचे बोबडे बोल ऐकले नाहीत, तेच बासरी मधुर असते, वाणी गोड असते, असे म्हणतात.

Tamil Transliteration
Kuzhal Inidhu Yaazhinidhu Enpadham Makkal
Mazhalaichchol Kelaa Thavar.

Explanations
Holy Kural #६७
पित्याचे पुत्रासंबंधी कर्तव्य कोणते? सभेत पहिल्या रांगेत बसण्याइतपत त्याला लायक करणे.

Tamil Transliteration
Thandhai Makarkaatrum Nandri Avaiyaththu
Mundhi Iruppach Cheyal.

Explanations
Holy Kural #६८
आपल्या मुलांनी आपल्याहून मोठे व्यावे असे पित्याला वाटत असते.

Tamil Transliteration
Thammindham Makkal Arivutaimai Maanilaththu
Mannuyirk Kellaam Inidhu.

Explanations
Holy Kural #६९
पुत्र जन्माला आला एवढचानेही मातेला आनंद होतो, परंतु मुलाची कीर्ती ऐकून तिला जो आनंद होतो, त्याला सीमा नाही.

Tamil Transliteration
Eendra Pozhudhin Peridhuvakkum Thanmakanaich
Chaandron Enakketta Thaai.

Explanations
Holy Kural #७०
पुत्राचे पित्यासंबंधी कर्तव्य कोणते? कोणत्य पूर्वपुण्याईने असा पुत्र तुम्हाला मिळाला, असे सारे जग आपल्या पित्याला विचारील अशा रीतीने वागणे.

Tamil Transliteration
Makandhandhaikku Aatrum Udhavi Ivandhandhai
Ennotraan Kol Enum Sol.

Explanations
🡱