पुरुषार्थशाली उद्योग
Verses
अशक्य समजून कोणत्याही कार्यपासून मागे नको वळू तुझे प्रयत्न; कोणतीही गोष्ट प्राप्त करून घ्यायला तुला समर्थ करतील.
Tamil Transliteration
Arumai Utaiththendru Asaavaamai Ventum
Perumai Muyarsi Tharum.
कोणतेही काम अर्धवट नको ठेवू. काम अर्धवट सोडणान्यांची जग पर्व करीत नाही.
Tamil Transliteration
Vinaikkan Vinaiketal Ompal Vinaikkurai
Theerndhaarin Theerndhandru Ulaku.
कितीही कष्ट पडले तरी जो खचत नाही, त्यालाच सर्वांची सेवा करण्याची शक्ती लाभण्याचे भाग्य असते.
Tamil Transliteration
Thaalaanmai Ennum Thakaimaikkan Thangitre
Velaanmai Ennunj Cherukku.
षंढाच्या हातातील हत्याराप्रमाणे आळशी माणसाचे औदार्य होय. ते औदार्य टिकत नाही.
Tamil Transliteration
Thaalaanmai Illaadhaan Velaanmai Petikai
Vaalaanmai Polak Ketum.
जो सुखासीन नसून यत्नदेव आहे, तो सामर्थ्यस्तंभ आहे; तो आपल्या मित्रांना आधार वाटतो; तो त्यांचे दुःखाश्रू पुसून टाकतो.
Tamil Transliteration
Inpam Vizhaiyaan Vinaivizhaivaan Thankelir
Thunpam Thutaiththoondrum Thoon.
उद्योग म्हणजे भाग्यजननी; आलस्य म्हणजे दारिद्र्य आणि विनाश यांची जननी.
Tamil Transliteration
Muyarsi Thiruvinai Aakkum Muyatrinmai
Inmai Pukuththi Vitum.
दुःखदेवतेचेघर आलस्यात असते. परंतु जो आलस्य-वश होत नाही, त्याच्या उद्योगात लक्ष्मी येऊन नांदते.
Tamil Transliteration
Matiyulaal Maamukati Enpa Matiyilaan
Thaalulaan Thaamaraiyi Naal.
जवळ संपत्ती नाही म्हणून लाजायचे कारण नाही; परंतु जाणूनबुजून श्रमापासून पराङ्मुख होणे ही गोष्ट मात्र लाजिरवाणी आहे.
Tamil Transliteration
Poriyinmai Yaarkkum Pazhiyandru Arivarindhu
Aalvinai Inmai Pazhi.
जरी देव आणि दानवही तुझ्याविरुद्ध उभे राहिले तरी उद्योगदेवता तुझ्या श्रमाचे फल तुला दिल्यावाचून शहणार नाही.
Tamil Transliteration
Theyvaththaan Aakaa Theninum Muyarsidhan
Meyvaruththak Kooli Tharum.
देवला शरण न जाता जे अखंड यत्नशील असतात, ते दैवाला फजित करतात.
Tamil Transliteration
Oozhaiyum Uppakkam Kaanpar Ulaivindrith
Thaazhaadhu Ugnatru Pavar.