न्यायीपणा

Verses

Holy Kural #१११
न्यायीपणा म्हणजे सदाचाराचा आध्यन्त आहे. शत्रू असो, मित्र असो; त्याला त्याच्या योग्यतेनुरूप देणे याला न्यायीपणा म्हणतात.

Tamil Transliteration
Thakudhi Enavondru Nandre Pakudhiyaal
Paarpattu Ozhukap Perin.

Explanations
Holy Kural #११२
न्यायाने वागणान्याचे वैभव कमी होत नाही; ते अतिदूरच्या पिढयांपर्यतही टिकते

Tamil Transliteration
Seppam Utaiyavan Aakkanj Chidhaivindri
Echchaththir Kemaappu Utaiththu.

Explanations
Holy Kural #११३
सत्पथच्युत होण्याने संपत्ती मिळणार असली, तरी ती घेऊ नका. केवढाही फायदा होणार असला, तरी दूर राहा.

Tamil Transliteration
Nandre Tharinum Natuvikandhaam Aakkaththai
Andre Yozhiya Vital.

Explanations
Holy Kural #११४
परिणामावरून त्या त्या गोष्टीची योग्यायोग्यता ठरत असते, शहानिशा होत असते.

Tamil Transliteration
Thakkaar Thakavilar Enpadhu Avaravar
Echchaththaar Kaanap Patum.

Explanations
Holy Kural #११५
सुखदुःख सर्वच्याच वाटचास येते; परंतु थोर मनुष्याचे न्यायी हृदय हे त्याचे खरे भूषण होय.

Tamil Transliteration
Ketum Perukkamum Illalla Nenjaththuk
Kotaamai Saandrork Kani.

Explanations
Holy Kural #११६
ज्या क्षणी तुझे हृदय सत्पथच्युत होऊन असत्पथाकडे वळू लागेल, त्या क्षणी तुझा विनाश जवळ आला असे समज

Tamil Transliteration
Ketuvalyaan Enpadhu Arikadhan Nenjam
Natuvoreei Alla Seyin.

Explanations
Holy Kural #११७
न्यायी नि सद्‌गुणी माणसाच्या दारिद्र्चाकडे जग तिरस्काराने पाहात नाही.

Tamil Transliteration
Ketuvaaka Vaiyaadhu Ulakam Natuvaaka
Nandrikkan Thangiyaan Thaazhvu.

Explanations
Holy Kural #११८
ती तराजूची सरळ दांडी न्यायाने मापते. त्या दांडीप्रमाणे सरळ राहून इकडे तिकडे न झुकता न्यायनिष्ठ राहण्यात शहाण्या माणसाचा गौरव आहे.

Tamil Transliteration
Samanseydhu Seerdhookkung Kolpol Amaindhorupaal
Kotaamai Saandrork Kani.

Explanations
Holy Kural #११९
जर हृदयात सदैव सत्य असेल, तर त्या मनुष्याच्या मुखातून बाहेर पडणारा शब्द म्हणजेच खरा न्याय होय.

Tamil Transliteration
Sorkottam Illadhu Seppam Orudhalaiyaa
Utkottam Inmai Perin.

Explanations
Holy Kural #१२०
स्वतःच्या फायध्याप्रमाणेच जो व्यापारी दुसन्याच्या फयध्याकडे बघतो त्याचा पसारा वाढल, वैभव वाढल.

Tamil Transliteration
Vaanikam Seyvaarkku Vaanikam Penip
Piravum Thamapol Seyin.

Explanations
🡱