निःसंगाचा मोठेपणा

Verses

Holy Kural #२१
भोगविलास सोडणारे आणि प्रखर वैराग्याने राहणारे ते लोक बघ; इतर सर्व चांगल्या गोष्टींपेक्षा आस्त्रपुराणांना अशांचीच कैर्ती गायला आवडते.

Tamil Transliteration
Ozhukkaththu Neeththaar Perumai Vizhuppaththu
Ventum Panuval Thunivu.

Explanations
Holy Kural #२२
विरक्त व निःसंग पुरुषाचा पार तुला लागणार नाही. तसे तुला करता आले, तर आजपर्यतच्या सर्व मृतांचीही मोजदाद तुला करता येईल.

Tamil Transliteration
Thurandhaar Perumai Thunaikkoorin Vaiyaththu
Irandhaarai Ennikkon Tatru.

Explanations
Holy Kural #२३
इहपराची तुलना करून ज्यांनी ऐहिकाचा त्याग केला, असे ते लोक बघ; त्यांच्या तेजाने ही पृथ्वी धवळली आहे.

Tamil Transliteration
Irumai Vakaidherindhu Eentuaram Poontaar
Perumai Pirangitru Ulaku.

Explanations
Holy Kural #२४
अंकुशाने हत्तीला ताब्यात ठेवावे, त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवणारा तो नरपुंगव पाहा. स्वर्गीय शेतात पेरणी करण्यासरखा तो दाणा आहे.

Tamil Transliteration
Uranennum Thottiyaan Oraindhum Kaappaan
Varanennum Vaippirkor Viththu.

Explanations
Holy Kural #२५
ज्याने वासनांवर जय मिळविला, त्याची शक्ती जाणण्याची तुला इच्छा आहे? तर मग देवेन्द्राकडे पाहा. हे एक उदाहरण बस्स आहे.

Tamil Transliteration
Aindhaviththaan Aatral Akalvisumpu Laarkomaan
Indhirane Saalung Kari.

Explanations
Holy Kural #२६
असाध्याला साध्य करून धॆणारे धन्य होत. तेच खरे महात्मे. ज्यांना हे साधत नाही, ते ख्ररे दुबळे

Tamil Transliteration
Seyarkariya Seyvaar Periyar Siriyar
Seyarkariya Seykalaa Thaar.

Explanations
Holy Kural #२७
शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध या पंचेंद्रियांच्या विषयांची खरी किमत ज्याने ओळखली आहे असा तो पुरुष पाहा. सान्या जगावर तो सत्ता गाजवील.

Tamil Transliteration
Suvaioli Ooruosai Naatramendru Aindhin
Vakaidherivaan Katte Ulaku.

Explanations
Holy Kural #२८
ज्याच्या वाणीत अपार सामर्थ्य आहे, अशा या पुरुषाच्या मिठिपणाची स्तोत्रे वेद-पुराणे गात असतात.

Tamil Transliteration
Niraimozhi Maandhar Perumai Nilaththu
Maraimozhi Kaatti Vitum.

Explanations
Holy Kural #२९
वैराग्याच्या दृढ आधारावर जे उभे आहेत, त्यांची वक्रदृष्टी कोण सहन करील?

Tamil Transliteration
Kunamennum Kundreri Nindraar Vekuli
Kanameyum Kaaththal Aridhu.

Explanations
Holy Kural #३०
ब्राह्मण तो, जो त्यागी व निःसंग आहे. याच दृष्टीने त्याच्याकडे पाहिले पाहिजे. कारण प्राणिमात्राविषयी त्याला दया असते.

Tamil Transliteration
Andhanar Enpor Aravormar Revvuyir Kkum
Sendhanmai Poontozhuka Laan.

Explanations
🡱