सदाचार-माहात्मा

Verses

Holy Kural #३१
सदाचरने मोक्षही मिळतो व अर्थप्राप्तीही होते. असे जर आहे, तर सदाचाराहून अधिक हितकर असे दुसरे काय बरे आहे?

Tamil Transliteration
Sirappu Eenum Selvamum Eenum Araththinooungu
Aakkam Evano Uyirkku.

Explanations
Holy Kural #३२
सदाचाराहून अधिक चांगले दुसरे काही नाही; सदाचार-त्यागासारखे हानिकारक दुसरे काही नाही.

Tamil Transliteration
Araththinooungu Aakkamum Illai Adhanai
Maraththalin Oongillai Ketu.

Explanations
Holy Kural #३३
सत्कर्में करण्यात कधी खंड पाडू नकोस; सारी शक्ती वेचून सत्कर्में करीत राहा.

Tamil Transliteration
Ollum Vakaiyaan Aravinai Ovaadhe
Sellumvaai Ellaanj Cheyal.

Explanations
Holy Kural #३४
मनाने शुद्ध राहा. हृदयशुद्धीत सारा सदाचार सामावलेला असतो; बाकी गोष्टी म्हणजे दंभ होय

Tamil Transliteration
Manaththukkan Maasilan Aadhal Anaiththu Aran
Aakula Neera Pira.

Explanations
Holy Kural #३५
मत्सर, क्रोध, लोभ आणि कठोर वाणी यांचा त्याग कर. सदाचार-संपादनाचा हा राजमार्ग आहे.

Tamil Transliteration
Azhukkaaru Avaavekuli Innaachchol Naankum
Izhukkaa Iyandradhu Aram.

Explanations
Holy Kural #३६
हळहळू मी सदाचारी होईन, असे नको मनात म्हणू. विलंभ न लावता एकदम सदाचारास आरंभ कर. मरणाच्या दिवशी सदाचार हाच तुझा चिरमित्र असेल.

Tamil Transliteration
Andrarivaam Ennaadhu Aranjeyka Matradhu
Pondrungaal Pondraath Thunai.

Explanations
Holy Kural #३७
मनुष्य सदाचारी असल्यावर त्याचे कोणते कल्याण होईल, ये नको मला विचारू पालखीत बसणारा नि पालखी खांध्यावरून वाहणारा पाहा म्हणजे झाले! (पूर्व-सुकृताचा परिणाम)

Tamil Transliteration
Araththaaru Ithuvena Ventaa Sivikai
Poruththaanotu Oorndhaan Itai.

Explanations
Holy Kural #३८
एक क्षणही फुकट न दवडता जर तॊ जन्म भर सत्कृत्ये करीत राहशील, तर जन्ममरणाचा सारा रस्ता चालून गेल्याप्रमाणे होईल.

Tamil Transliteration
Veezhnaal Pataaamai Nandraatrin Aqdhoruvan
Vaazhnaal Vazhiyataikkum Kal.

Explanations
Holy Kural #३९
सदाचाराने जो आनंद मिळतो, तोच आनंद खरा; बाकीचे आनंद आणि बाकीची सुखे ही शेवटी रडवतात, फजीत करतात.

Tamil Transliteration
Araththaan Varuvadhe Inpam Mar Rellaam
Puraththa Pukazhum Ila.

Explanations
Holy Kural #४०
तेच कृत्य करावे, जे सदाचारमूलक आहे. शहणे लोक ज्यामुळे तुझी निंदा करतील, असे काहीही करू नकोस.

Tamil Transliteration
Seyarpaala Thorum Arane Oruvarku
Uyarpaala Thorum Pazhi.

Explanations
🡱