क्षमा

Verses

Holy Kural #१५१
आपले पोट फाडणान्यांचेही ही पृथ्बी पोषण करते, धारण करते; त्याप्रमाणे तुला दुःख देणान्यांचाही सांभाळ कर. कारण यातच खरा मोठेपणा आहे.

Tamil Transliteration
Akazhvaaraith Thaangum Nilampolath Thammai
Ikazhvaarp Poruththal Thalai.

Explanations
Holy Kural #१५२
दुसन्यांनी कितीही अपाय केले तरी तू क्षमाच कर; आणि ते सारे विसरून गेलास तर सोन्याहून पिवळे.

Tamil Transliteration
Poruththal Irappinai Endrum Adhanai
Maraththal Adhaninum Nandru.

Explanations
Holy Kural #१५३
दुसन्याचे स्वागत न करणे हे खरे लज्जास्पद दारिद्र्य; मूर्खच्य मूर्खपाणाचाही राग येऊ न देणे हे खरे थोर सामर्थ्य.

Tamil Transliteration
Inmaiyul Inmai Virundhoraal Vanmaiyul
Vanmai Matavaarp Porai.

Explanations
Holy Kural #१५४
थोरपणा हवा असेल, सदैव उन्नत राहण्याची इच्छा असेल, तर दुसन्यांनी केलेल्या अतिक्रमणाची सदैव क्षमा करण्याची सवय मनःपूर्वक प्रयत्नांनी लावून घे

Tamil Transliteration
Niraiyutaimai Neengaamai Ventin Poraiyutaimai
Potri Yozhukap Patum.

Explanations
Holy Kural #१५५
उपकाराचा बदला घेणान्यांविषयी शहाण्यांना फारसे काही वाटत नाही; परंतु शत्रुलाही क्षमा करणान्यांना ते सोन्यामोत्यांप्रमाणे जपतात.

Tamil Transliteration
Oruththaarai Ondraaka Vaiyaare Vaippar
Poruththaaraip Ponpor Podhindhu.

Explanations
Holy Kural #१५६
सुडाचा आनंद एक दिवस टिकतो; क्षमा करणान्यांचे यश चिरंजीव आहे.

Tamil Transliteration
Oruththaarkku Orunaalai Inpam Poruththaarkkup
Pondrun Thunaiyum Pukazh.

Explanations
Holy Kural #१५७
तुम्हांला झालेला अपाय केवढाही मोठा असो, भोगावे लागलेले दुःख किती का तीव्र अ सेना त्या गोष्टी मनाला लावून न घेणे, सूडबुद्धी मनात येऊ न देणे, यात खरा चांगुलपाणा आहे.

Tamil Transliteration
Thiranalla Tharpirar Seyyinum Nonondhu
Aranalla Seyyaamai Nandru.

Explanations
Holy Kural #१५८
अह कारामुळे ज्यांनी तुला दुखविले, त्यांना मनाच्या थिरपणाने जिंकून घे.

Tamil Transliteration
Mikudhiyaan Mikkavai Seydhaaraith Thaandham
Thakudhiyaan Vendru Vital.

Explanations
Holy Kural #१५९
उपहास करणान्यांच्या विशारी जिभेला जे शांतपणे सहन करतात, ते सर्वसंगपरित्याग केलेल्या संन्याशांहूनही थोर आहेत.

Tamil Transliteration
Thurandhaarin Thooimai Utaiyar Irandhaarvaai
Innaachchol Norkir Pavar.

Explanations
Holy Kural #१६०
उपवास करून तप करणारे मोठे खरे; परंतु दुसन्यांनी केलेल्या निंदेची, उपहासाची जे क्षमा करतात, अशंच्या खालीच त्यांचा नंबर

Tamil Transliteration
Unnaadhu Norpaar Periyar Pirarsollum
Innaachchol Norpaarin Pin.

Explanations
🡱