निर्मत्सरता
Verses
ज्या वेळेस हृदयात मत्सराचा लेशही आढळणार नाही, त्या वेळेसच तुझे हृदय सद्गुणांकडे जात असे समज.
Tamil Transliteration
Ozhukkaaraak Kolka Oruvandhan Nenjaththu
Azhukkaaru Ilaadha Iyalpu.
निमंत्सर स्वभावाहून अधिक थोर व श्रेष्ठ असे दुसरे काय आहे?
Tamil Transliteration
Vizhuppetrin Aqdhoppadhu Illaiyaar Maattum
Azhukkaatrin Anmai Perin.
ज्याला सद्गुणांची पर्वा नाही, भाग्याची इच्छा नाही, तोज शेजान्याच्या भरभराटीचा आनंद न मानता मत्सर करील.
Tamil Transliteration
Aranaakkam Ventaadhaan Enpaan Piranaakkam
Penaadhu Azhukkarup Paan.
शहाणे लोक मत्सरग्रस्त होऊन दुसन्यास कधी अपाय करीत नाहीत. कारण अशा नीच भावना मानत खेळविल्याने काय तोटे होतात, ते त्यांना माहीत असते.
Tamil Transliteration
Azhukkaatrin Allavai Seyyaar Izhukkaatrin
Edham Patupaakku Arindhu.
मत्सरी माणसाच्या मनातील मत्सर हीच त्याला शिक्षा होय, कारण त्याच्या शत्रूंनी जरी त्याला वाचविले तरी त्याच्या मनातील मत्सर त्याचा नाश करील.
Tamil Transliteration
Azhukkaaru Utaiyaarkku Adhusaalum Onnaar
Vazhukka?yum Keteen Padhu.
दुसन्याचे वैभव ज्याला बघवत नाही, त्याच्या कुटुंबाला दोन प्रहरची भ्रांत पडेल.
Tamil Transliteration
Kotuppadhu Azhukkaruppaan Sutram Utuppadhooum
Unpadhooum Indrik Ketum.
लक्ष्मीला मत्सरी माणसे आवडत नाहीत, आपल्या वडीलबहिणीच्या- विपत्तीच्या- त्यांना स्वाधीन करून ती निघून जाते.
Tamil Transliteration
Avviththu Azhukkaaru Utaiyaanaich Cheyyaval
Thavvaiyaik Kaatti Vitum.
अतिमत्सराने मनुष्य भिकेला लागते आणु शेवटी नरकात जातो.
Tamil Transliteration
Azhukkaaru Enaoru Paavi Thiruchchetruth
Theeyuzhi Uyththu Vitum.
मत्सरी वैभवात आणि उदार मनुष्य विपत्तीत? छेः, असे होणे म्हणजे नवलच म्हणायचे.
Tamil Transliteration
Avviya Nenjaththaan Aakkamum Sevviyaan
Ketum Ninaikkap Patum.
द्वेषमत्सराने कधीही भाग्य लाभले नाही; उदाराला कधीही बाघ्यच्युत व्हावे लागले नाही.
Tamil Transliteration
Azhukkatru Akandraarum Illai Aqdhuillaar
Perukkaththil Theerndhaarum Il.