सैन्य

Verses

Holy Kural #७६१
राजाच्या मालकीच्या गोष्‍टींपैकी मुख्य गोष्‍ट म्हणजे शिस्तीत वाढलेले सुसज्ज सैन्य होय.

Tamil Transliteration
Uruppamaindhu Ooranjaa Velpatai Vendhan
Verukkaiyul Ellaam Thalai.

Explanations
Holy Kural #७६२
बिकट परिस्थितीत भयंकर हल्ले होत असताही जे खरे वीर असतात ते 'मारू किंवा मरू' या निश्‍चयाने उभे असतात.

Tamil Transliteration
Ulaivitaththu Ooranjaa Vankan Tholaivitaththuth
Tholpataik Kallaal Aridhu.

Explanations
Holy Kural #७६३
उंदरांची प्रचंड सेना समुद्राप्रमाणे गदारोळ करीत आली तरी भुजंगाचा एक फूत्‍कर ऐकताच त्यांची गर्जना बंद पडेल.

Tamil Transliteration
Oliththakkaal Ennaam Uvari Ela?ppakai
Naakam Uyirppak Ketum.

Explanations
Holy Kural #७६४
ती खरी सेना, जिला पराजय माहीत नाही, फितुरी ठाऊक नाही, आणि पराक्रम जिची परंपरा आहे.

Tamil Transliteration
Azhivindri Araipokaa Thaaki Vazhivandha
Vanka Nadhuve Patai.

Explanations
Holy Kural #७६५
खवळलेला काळ प्रत्यक्ष समोर युद्धास आला असताही जे सैन्य शौर्याने तोंड देते, ते खरे सैन्य.

Tamil Transliteration
Kootrutandru Melvarinum Kooti Edhirnirkum
Aatra Ladhuve Patai.

Explanations
Holy Kural #७६६
पराक्रम , स्वाभिमान, गोंधळातही झटपट निर्णय घेणे आणि परंपरागत शौर्य-धैर्याची प्रभा, या चार गोष्‍टी म्हणजे सैन्याचे चिलखत होय.

Tamil Transliteration
Maramaanam Maanta Vazhichchelavu Thetram
Enanaanke Emam Pataikku.

Explanations
Holy Kural #७६७
खरे लढाऊ सैन्य शत्रूसाठी टपलेले असते. शत्रू केव्हाही आला तरी त्याला तेव्हाच मातीत मिळवू, असा त्याला आत्मविश्‍वास असतो.

Tamil Transliteration
Thaardhaangich Chelvadhu Thaanai Thalaivandha
Pordhaangum Thanmai Arindhu.

Explanations
Holy Kural #७६८
सैन्य जरी दमदार, काटक नि सहनशील असले तरी दारूगोळा नि इतर लष्‍करी साधनांच्या योगेच विजय प्राप्‍त होत असतो.

Tamil Transliteration
Ataldhakaiyum Aatralum Illeninum Thaanai
Pataiththakaiyaal Paatu Perum.

Explanations
Holy Kural #७६९
जे संख्येने कमी नाही, वेळेवर पगार मिळत असल्यामुळे जे उपाशी नाही, जे द्वेषमत्‍सरद्रोहाने ग्रस्‍त नाही, ते सैन्य नेहमी विजयीच होणार.

Tamil Transliteration
Sirumaiyum Sellaath Thuniyum Varumaiyum
Illaayin Vellum Patai.

Explanations
Holy Kural #७७०
सैनिकू भरपूर आहेत; परंतु सेनानींची वाण असेल तर सैन्य कसे उभे करता येईल.

Tamil Transliteration
Nilaimakkal Saala Utaiththeninum Thaanai
Thalaimakkal Ilvazhi Il.

Explanations
🡱