आत्मनिरपेक्ष योद्धा

Verses

Holy Kural #७७१
हे शत्रूने, रणांगणात माझ्य़ा स्वामीसमिर उभे राहू नका. ज्यांनी ज्यांनी आजपर्यत त्याला आव्हान केले, त्यांच्या शवांवर कबरी उभ्या राहिल्या.

Tamil Transliteration
Ennaimun Nillanmin Thevvir Palarennai
Munnindru Kalnin Ravar.

Explanations
Holy Kural #७७२
नेम धरून सशाला बाणाने ठार मारण्यापेक्षा हत्तीवर भाला फेकून त्याला तो न लगाला तरी त्यात अधिक शौर्य आहे.

Tamil Transliteration
Kaana Muyaleydha Ampinil Yaanai
Pizhaiththavel Endhal Inidhu.

Explanations
Holy Kural #७७३
निःशंकपणे शत्रूवर तुटून पडण्याला पराक्रम म्हणतात; परंतु पराभूताला उदारपणे क्षमणे नि वाचविणे यत मोठेपणा आहे. त्याने पराक्रमाला शोभा चढते.

Tamil Transliteration
Peraanmai Enpa Tharukanon Rutrakkaal
Ooraanmai Matradhan Eqku.

Explanations
Holy Kural #७७४
त्या वीराने स्वतःचा भाला शत्रूच्या हत्तीवर फेकला; तो दुसरा भाला बघत होता, इतक्यात स्वतःच्या शरीरातच रुतलेला भाला त्याला दिसला, परमानंदाने तोच उपटून त्याने हातात घेतला.

Tamil Transliteration
Kaivel Kalitrotu Pokki Varupavan
Meyvel Pariyaa Nakum.

Explanations
Holy Kural #७७५
आपल्यावर भाला फेकला जात अस्ता डोळा लवणे हे वीराला लाजिरवाणे नाही का?

Tamil Transliteration
Vizhiththakan Velkona Teriya Azhiththimaippin
Ottandro Vanka Navarkku.

Explanations
Holy Kural #७७६
रक्‍तस्रावी जखमा ज्या दिवशी वीराला स्वतःच्या शरीरावर दिसत नाहीत, तो दिवस त्याला व्यर्थ गोल्याप्रमाणे वाटतो.

Tamil Transliteration
Vizhuppun Pataadhanaal Ellaam Vazhukkinul
Vaikkumdhan Naalai Etuththu.

Explanations
Holy Kural #७७७
त्रिभुवनव्यापी कीर्ती मिळावी म्हणून जे उत्सुक असतात, प्राणांची ज्यांना पर्व नसते, त्याला डाव्या पायातील तो तोडर पाहणे किती धन्यतेचे असते!

Tamil Transliteration
Suzhalum Isaiventi Ventaa Uyiraar
Kazhalyaappuk Kaarikai Neerththu.

Explanations
Holy Kural #७७८
योद्धे युद्धात प्राणाची पर्वा करीत नाहीत. प्राण धोक्यात घालू नका, असे सेनानीने सांगितले तरीही ते निःशंकपणे शत्रूवर तुटून पडतात.

Tamil Transliteration
Urinuyir Anjaa Maravar Iraivan
Serinum Seerkundral Ilar.

Explanations
Holy Kural #७७९
स्वीकृत कामी यश यावे म्हणून जे प्राणापर प्रयत्‍न करतात, त्यांना कोण बरे नावे ठेवील?

Tamil Transliteration
Izhaiththadhu Ikavaamaich Chaavaarai Yaare
Pizhaiththadhu Orukkir Pavar.

Explanations
Holy Kural #७८०
ज्याला आपल्या मरणाने सेनानीच्या डोळयातून अश्रु आनता येतील, असे मरण यावे म्हणून भिक्षा मागितली तरी काय हरकत?

Tamil Transliteration
Purandhaarkan Neermalkach Chaakirpin Saakkaatu
Irandhukol Thakkadhu Utaiththu.

Explanations
🡱