सज्जनांची मैत्री

Verses

Holy Kural #४४१
सदाचाराच्या मार्गाने जाता जाता जे बुद्ध झाले, त्यांना मान दे, त्यांचा स्नेह जोड.

Tamil Transliteration
Aranarindhu Mooththa Arivutaiyaar Kenmai
Thiranarindhu Therndhu Kolal.

Explanations
Holy Kural #४४२
तुझ्यावर आलेली संकटे जो दूर करू शकेल आणि येणान्या आघातांपासून जो तुला वाचवू शकेल, अशाला धुंडाळून मोठया उत्सुकतेने त्याची मैत्री जोड.

Tamil Transliteration
Utranoi Neekki Uraaamai Murkaakkum
Petriyaarp Penik Kolal.

Explanations
Holy Kural #४४३
खन्या योग्यतेच्या माणसांची निष्‍ठा जर तुला मिळू शकली तर अत्यंत दुर्मिळ असा एक ठेवा तुला मिळाला.

Tamil Transliteration
Ariyavatru Lellaam Aridhe Periyaaraip
Penith Thamaraak Kolal.

Explanations
Holy Kural #४४४
तुझ्याहून मोठया योग्यतेचे जर तुझे मित्र झाले तर ज्याच्यापुढे इतर सारी सामर्थ्ये फिकी पडतील असे थोर सामर्थ्य तू मिळविलेस असे म्हणता येईल.

Tamil Transliteration
Thammir Periyaar Thamaraa Ozhukudhal
Vanmaiyu Lellaan Thalai.

Explanations
Holy Kural #४४५
मंत्री म्हणजे राजाचे डोले. सरासार विचार करून मोठया शहणपणाने त्याने ते निवडावे.

Tamil Transliteration
Soozhvaarkan Naaka Ozhukalaan Mannavan
Soozhvaaraik Soozhndhu Kolal.

Explanations
Holy Kural #४४६
खन्या थोर पुरुषांचा संगतीत जो असतो, त्याच्यासमोर त्याचे शत्रू हतप्रभ होतात.

Tamil Transliteration
Thakkaa Rinaththanaaith Thaanozhuka Vallaanaich
Chetraar Seyakkitandha Thil.

Explanations
Holy Kural #४४७
जे आपणांस शिकवू शकतील, आपले कान उपटण्याचा ज्यांना अधिकार आहे, अशांची मैत्री ज्याने जोडली, त्याचा नाश कोण करू शकेल?

Tamil Transliteration
Itikkun Thunaiyaarai Yaalvarai Yaare
Ketukkun Thakaimai Yavar.

Explanations
Holy Kural #४४८
आपल्याहून जे श्रेष्‍ठ आहेत, जे आपणांस चार हिताचे शब्द सांगू शकतील, अशांची मैत्री जो राजा जोडीत नाही, त्याचा शत्रू नसेल तरीही नाश होईल.

Tamil Transliteration
Itippaarai Illaadha Emaraa Mannan
Ketuppaa Rilaanung Ketum.

Explanations
Holy Kural #४४९
भांडवलाशिवाय नफा नाही, त्याप्रमाणे शहणांचा ज्याला खंबीर आधार नाही, त्याचे आसन स्थिर नाही.

Tamil Transliteration
Mudhalilaarkku Oodhiya Millai Madhalaiyaanjjch
Aarpilaark Killai Nilai.

Explanations
Holy Kural #४५०
एकदम अनेक शत्रू उत्पन्न करणे अविचार होय; परंतु भल्याभल्या माणसांचा स्नेह गमावून बसणे हा दसपट अविचार होय.

Tamil Transliteration
Pallaar Pakai Kolalir Paththatuththa Theemaiththe
Nallaar Thotarkai Vital.

Explanations
🡱