राजासमॊर कस वागावे

Verses

Holy Kural #६९१
राजाजवळ वागताना, ऊब येण्यासाठी विस्तवापासून फार दूर नाही, परंतु फार जवळही नाही असे आपण बसतो, तसे असावे.

Tamil Transliteration
Akalaadhu Anukaadhu Theekkaaivaar Polka
Ikalvendharch Cherndhozhuku Vaar.

Explanations
Holy Kural #६९२
ज्या गोष्‍टीची राजाला इच्छा असते, तिच्याविषयी आपण हपापलेले नसणे, हा त्याची मर्जी संपादण्याचा निश्‍चित उपाय आहे. त्यामुळे धनलाभही होईल.

Tamil Transliteration
Mannar Vizhaipa Vizhaiyaamai Mannaraal
Manniya Aakkan Tharum.

Explanations
Holy Kural #६९३
आपली नाचक्की होऊ नये असे वाटत असेल तर अपयशी न होण्याची दक्षता बाळग. तू कोणतेही काम नीत पार पाडू शकत नाहीस असा एकदा बभ्रा झाला म्हणजे तो कधीही दूर करता येणार नाही.

Tamil Transliteration
Potrin Ariyavai Potral Katuththapin
Thetrudhal Yaarkkum Aridhu.

Explanations
Holy Kural #६९४
थोरामोठयांच्या देखत कानांत कुजबुजू नये; किंवा ते जवळ असता दुसन्यांकडे पाहून हसूही नये.

Tamil Transliteration
Sevichchollum Serndha Nakaiyum Aviththozhukal
Aandra Periyaa Rakaththu.

Explanations
Holy Kural #६९५
कोणाचे बोलणे चोरून ऐकू नकोस; जे तुझ्यापासून मुद्दाम गुप्‍त राखण्यात आलेले आहे, ते माहीत करून घेण्याच्या भानगडीत पडू नकोस. ज्या वेळेस एखादी गोष्‍ट तुला सांगितली जाईल त्या वेळेसच तू ती ऐक.

Tamil Transliteration
Epporulum Oraar Thotaraarmar Rapporulai
Vittakkaal Ketka Marai.

Explanations
Holy Kural #६९६
राजाची लहर लक्षात घ्यावी; काळवेळ ओळखून राजाला ज्यायोगे संतोष होईल असे आकर्षक बोलणे करावे.

Tamil Transliteration
Kuripparindhu Kaalang Karudhi Veruppila
Ventupa Vetpach Cholal.

Explanations
Holy Kural #६९७
प्रिय असणान्या गोष्‍टीच राजासमोर बोलाव्या. त्याने 'सांग' म्हणून आज्ञापिले तरीही अप्रिय नि अहितकर गोष्‍टी त्याला सांगू नयेत.

Tamil Transliteration
Vetpana Solli Vinaiyila Egngnaandrum
Ketpinum Sollaa Vital.

Explanations
Holy Kural #६९८
राजा अल्पवयी असी वा आप्‍तसंबंधी असो; त्याच्याजवळ थट्टामस्करी करू नये. त्याच्या प्रतिष्‍ठेत साजेसेच वर्तन त्याच्याजवळ करावे.

Tamil Transliteration
Ilaiyar Inamuraiyar Endrikazhaar Nindra
Oliyotu Ozhukap Patum.

Explanations
Holy Kural #६९९
ज्यांची दृष्‍टी गोंधळलेली नसून निर्मल नि स्वच्छ आहे, ते 'आपन राजाचे आवडते आहोत' म्हणून अनुचित वर्तन कधीही करणार नाहीत.

Tamil Transliteration
Kolappattem Endrennik Kollaadha Seyyaar
Thulakkatra Kaatchi Yavar.

Explanations
Holy Kural #७००
आपन राजाच्या फार विश्‍वासातील आहोत असे समजून जे अयोग्य वर्तन करतात, त्यांचा नाश होईल.

Tamil Transliteration
Pazhaiyam Enakkarudhip Panpalla Seyyum
Kezhudhakaimai Ketu Tharum.

Explanations
🡱