यश
Verses
गरिबाला गे आणि नावलौकिक मिळव, आपले नाव उज्ज्वल करणे याहून दुसरा फायदा मोठा कोणता?
Tamil Transliteration
Eedhal Isaipata Vaazhdhal Adhuvalladhu
Oodhiyam Illai Uyirkku.
जे गरिबास देतात, त्यांचे गुणगान सर्वांच्या तोंडी असते.
Tamil Transliteration
Uraippaar Uraippavai Ellaam Irappaarkkondru
Eevaarmel Nirkum Pukazh.
या मर्त्यलोकी सारे काही काळाच्या उदरात गडप होते, परंतु ज्यांची कृती या मानजातीच्या इतिहासात अपूर्व आहे, अशा थोरामोठयांची कीर्ती कधीच मरत नसते.
Tamil Transliteration
Ondraa Ulakaththu Uyarndha Pukazhallaal
Pondraadhu Nirpadhon Ril.
ज्याने चिरंजीव विश्वव्यापी यश मिळविले त्याला आकाशातील देव साधुसंतांच्याही आधी जागा देतात.
Tamil Transliteration
Nilavarai Neelpukazh Aatrin Pulavaraip
Potraadhu Puththel Ulaku.
ज्या त्यागाने यश वाढते ज्या मरणाने तेज चढते, तो त्याग आणि ते मरण या गोष्टी खरा शूरच करू शकतो; इतरांचे ते काम नाही.
Tamil Transliteration
Naththampol Ketum Uladhaakum Saakkaatum
Viththakark Kallaal Aridhu.
जगात आल्यासारखे यश मिळव. जगात येऊन ज्यांनी कीर्ती मिळविली नाही, ते जन्मास आले नसते तरी फार बरे झाले असते.
Tamil Transliteration
Thondrin Pukazhotu Thondruka Aqdhilaar
Thondralin Thondraamai Nandru.
जे स्वत: दोषमुक्त नाहीत ते स्वत:वर कधी दातोठ खातात का? स्वतःवर रागावतात का? जर नसतील तर ते निंदकांवर का संतापतात?
Tamil Transliteration
Pukazhpata Vaazhaadhaar Thannovaar Thammai
Ikazhvaarai Novadhu Evan?.
कीर्तिरूप अमरजीवन ज्यांनी मिळविले नाही, त्यांचा धिक्कार असो.
Tamil Transliteration
Vasaiyenpa Vaiyaththaark Kellaam Isaiyennum
Echcham Peraaa Vitin.
अपकीर्ती झालेल्यांच्या भाराने ही पृथ्वी किती वाकली आहे पाहा. धनधान्यासाठी विख्यात अशी ही वसुंधरा अशा दुष्टांमुळे हीन दशेस गेल्याशिवाय कशी राहील.
Tamil Transliteration
Vasaiyilaa Vanpayan Kundrum Isaiyilaa
Yaakkai Poruththa Nilam.
ज्यांचे जीवन निर्दोष आहे तेच खरोखर जगले; जे कीर्तीशिवाय जगले तेच खरोखर मेले.
Tamil Transliteration
Vasaiyozhiya Vaazhvaare Vaazhvaar Isaiyozhiya
Vaazhvaare Vaazhaa Thavar.