दया

Verses

Holy Kural #२४१
दयापूर्ण हृदय हीच खरी संपत्ती गरिबांतल्या गरिबाजवळही असू शकते.

Tamil Transliteration
Arutchelvam Selvaththul Selvam Porutchelvam
Pooriyaar Kannum Ula.

Explanations
Holy Kural #२४२
सत्पथाने जा आणि दयाशील हो. दया हा एक मोक्षाचा मार्ग असे सर्व धर्मांतून, सर्व पंथांतून सांगितलेले आहे.

Tamil Transliteration
Nallaatraal Naati Arulaalka Pallaatraal
Therinum Aqdhe Thunai.

Explanations
Holy Kural #२४३
दयामय हृदयाच्या लोकांना अंधकारमय लोकी जावे लागणार नाही.

Tamil Transliteration
Arulserndha Nenjinaark Killai Irulserndha
Innaa Ulakam Pukal.

Explanations
Holy Kural #२४४
प्राणिमात्रावर जो दया करतो, प्रेम करतो, त्याच्या पाठीला जीवाला गांगरवून टाकणारी ती कर्मफले लागत नाहीत. तो मुक्त होतो.

Tamil Transliteration
Mannuyir Ompi Arulaalvaarkku Illenpa
Thannuyir Anjum Vinai.

Explanations
Holy Kural #२४५
दयार्द्र मनुष्याला कधी त्रास नसतो. वायुवेष्टित ही विशाल पृथ्वी या गोष्टीची साक्ष देत आहे.

Tamil Transliteration
Allal Arulaalvaarkku Illai Valivazhangum
Mallanmaa Gnaalang Kari.

Explanations
Holy Kural #२४६
जो निर्दय आहे आणि असत्याचरणी आहे, तो पूर्वजन्मातील स्वतःला भोगावे लागलेले विसरला- दयेचा धडा विसरला- असे शहाणे म्हणतात.

Tamil Transliteration
Porulneengip Pochchaandhaar Enpar Arulneengi
Allavai Seydhozhuku Vaar.

Explanations
Holy Kural #२४७
ज्याचे हृदय दया करू शकत नाही, त्याला परलोकी सुख नाही; ज्याप्रमाणो द्रव्यहीनास या लोकी सुख नाही.

Tamil Transliteration
Arulillaarkku Avvulakam Illai Porulillaarkku
Ivvulakam Illaaki Yaangu.

Explanations
Holy Kural #२४८
द्रव्याने दरिद्री असणान्यांची एक दिवस भरभराट होण्याची शक्यता आहे; परंतु ज्यांच्याजवल दयेचा तुटवडा आहे, त्यांच्या भाग्याचा दिवस कधीच येणार नाही.

Tamil Transliteration
Porulatraar Pooppar Orukaal Arulatraar
Atraarmar Raadhal Aridhu.

Explanations
Holy Kural #२४९
संशयग्रस्त नि गोंधळात पडलेल्या माणसास सत्य सापडणे ज्याप्रमाणे कठीण, त्याप्रमाणे कठोर माणसाच्या हातून सत्कर्म होणे कठीण.

Tamil Transliteration
Therulaadhaan Meypporul Kantatraal Therin
Arulaadhaan Seyyum Aram.

Explanations
Holy Kural #२५०
गरिबावर जुलूम करावा असा मोह जेव्हा तुला पडेल, त्या वेळेला आपल्याहून प्रबल असणारांसमोर आपण कसे थतथ रत होतो ते आठव.

Tamil Transliteration
Valiyaarmun Thannai Ninaikka Thaan Thannin
Meliyaarmel Sellu Mitaththu.

Explanations
🡱