निश्चयी संकल्पशक्‍ती

Verses

Holy Kural #६६१
कर्तृत्वाचा मोठेपणा हा वास्तविक दृढ इच्छाशक्‍तीचा मोठेपणा असतो. तिच्यामुळे कर्तृत्व शक्य होते. इतर गोष्‍टी शेवटपर्यत टिकत नसतात.

Tamil Transliteration
Vinaiththitpam Enpadhu Oruvan Manaththitpam
Matraiya Ellaam Pira.

Explanations
Holy Kural #६६२
जे सिद्धीस जाणारच नाही असे नक्की वाटते त्याचा आरंभ न करणे, अणि ज्याचा आरंभ केला ते कितीही अडचणी आल्या तरी न सोडणे, ही शहाण्या लोकांच्या वागणुकीची दोन तत्त्वे आहेत.

Tamil Transliteration
Oororaal Utrapin Olkaamai Ivvirantin
Aarenpar Aaindhavar Kol.

Explanations
Holy Kural #६६३
कार्यसिद्धीनंतरच कार्यकर्ता आपले मन बोलून दाखवितो; आपण आधीच आपले बेत जाहीर केले तर अपरिहार्य अडचणी मार्गात येण्याचा संभव असतो.

Tamil Transliteration
663, Kataikkotkach Cheydhakka Thaanmai Itaikkotkin
Etraa Vizhuman Tharum.

Explanations
Holy Kural #६६४
बोलणे सोपे असते; बोलल्याप्रमाणे तडीस नेणे महाकर्म कठीण.

Tamil Transliteration
Solludhal Yaarkkum Eliya Ariyavaam
Solliya Vannam Seyal.

Explanations
Holy Kural #६६५
मोठमोठी कामे करून दाखविल्याबद्दल ज्याची प्रसिद्धी आहे, अशा मनुष्याची राजाला फार जरूरी असते. तो राजाच्या उपयोगी पडेल नि सारे त्याची वाहवा करतील.

Tamil Transliteration
Veereydhi Maantaar Vinaiththitpam Vendhankan
Ooreydhi Ullap Patum.

Explanations
Holy Kural #६६६
इच्छेनुसार तुम्हांला सारे काही मिळेल; परंतु सारी इच्छाशक्‍ती तेथे हवी, सारी निश्‍चयी संकल्पशक्‍ती तेथे हवी.

Tamil Transliteration
Enniya Enniyaangu Eydhu Enniyaar
Thinniyar Aakap Perin.

Explanations
Holy Kural #६६७
केवल तोंडाकडे बघून मनुष्याला तुच्छ मानू नको. घडघड जाणारा प्रचंड रथ लहानशा आसावर अवलंबून असतो.

Tamil Transliteration
Uruvukantu Ellaamai Ventum Urulperundherkku
Achchaani Annaar Utaiththu.

Explanations
Holy Kural #६६८
संपूर्ण विचाराने एखादी गोष्‍ट करणाचे तू निश्‍चित केले असतील, तर चलबिचल होऊ न देता उत्साहपूर्वक त्या गोष्‍टीच्या मागे लाग.

Tamil Transliteration
Kalangaadhu Kanta Vinaikkan Thulangaadhu
Thookkang Katindhu Seyal.

Explanations
Holy Kural #६६९
ज्यांमुळे सुखाची वृद्धी होईल ती कर्मे कर. ती सिद्धीस नेण्यासाठी मन वज्राप्रमाणे कठोर नि खंबीर करून प्रयत्‍न कर. मरणान्तिक दुःखे सहन करावी लागली तरी हटू नको.

Tamil Transliteration
Thunpam Uravarinum Seyka Thunivaatri
Inpam Payakkum Vinai.

Explanations
Holy Kural #६७०
ज्यांचा निदचय दृढ नाही, त्यांनी आपल्या मार्गत कितीही मोठेपणा मिळविला, तरी जग त्यांना किंमत नाही.

Tamil Transliteration
Enaiththitpam Ey Thiyak Kannum Vinaiththitpam
Ventaarai Ventaadhu Ulaku.

Explanations
🡱