अहिंसा (अपाय नकरणे)
Verses
ज्याच्ये मन विशुद्ध आहे, त्याला मोठे राज्यपद मिळाले तरी तो दुसन्याला अपाय करणार नाही.
Tamil Transliteration
Sirappeenum Selvam Perinum Pirarkku Innaa
Seyyaamai Maasatraar Kol.
ज्याचे हृदय निर्मल नि पवित्र आहे, तो अपकार करणान्यांवरही प्रतुअपकार करणार नाही, दुसरे द्वेष्वश झाले तरी तो होणार नाही.
Tamil Transliteration
Karuththuinnaa Seydhavak Kannum Maruththinnaa
Seyyaamai Maasatraar Kol.
करणाशिवाय जरी कोणी तुला इजा केली, तरी प्रत्यपकार करू नको. कारण तसे करशील तर अपरिहार्य अशा आपत्ती मात्र तू आपल्यावर ओढवून घेशील.
Tamil Transliteration
Seyyaamal Setraarkkum Innaadha Seydhapin
Uyyaa Vizhuman Tharum.
अपकार करणान्याचे, अपाय करणान्याचे शासन तुम्ही त्याच्यावर उपकार करून करावे नि त्याला मनात लाजवावे.
Tamil Transliteration
Innaasey Thaarai Oruththal Avarnaana
Nannayanj Cheydhu Vital.
दुसन्याचे दुःख ते आपलेच दुःख, असे वाटून दुसन्यास दुःख देण्यापासून जो परावृत्त होत नाही, त्याची बुद्धी काय कामाची?
Tamil Transliteration
Arivinaan Aakuva Thunto Piridhinnoi
Thannoipol Potraak Katai.
मनुष्याला स्वत: एखाद्या दुःखाचा कटू अनुभव आला असेल, तर तेच दुःख दुसन्याला न देण्याची त्याने खबरदारी घ्यावी.
Tamil Transliteration
Innaa Enaththaan Unarndhavai Thunnaamai
Ventum Pirankan Seyal.
कधीही कोणाला थोडीसुद्धा पीडा न देणे, ही खरोखरच फार मोठी गोष्ट आहे.
Tamil Transliteration
Enaiththaanum Egngnaandrum Yaarkkum Manaththaanaam
Maanaasey Yaamai Thalai.
ज्याला स्वतःच दुःखाचा अनुभव आला, तो आपण होऊन दुसन्यास कसे बरे दुःख देईल.
Tamil Transliteration
Thannuyirkaku Ennaamai Thaanarivaan Enkolo
Mannuyirkku Innaa Seyal.
जर सकाळी तुम्ही शेजान्याला दुख्विले, तर तिसरे प्रहरीच तुमच्यावर आपत्ती आल्याशिवाय राहणार नाही.
Tamil Transliteration
Pirarkkinnaa Murpakal Seyyin Thamakku Innaa
Pirpakal Thaame Varum.
अपाय नि दुष्कृत्ये करणान्यावर त्याची सारी पापे येऊन आदळतात. ज्यांना दुष्परिणामांपासून नि अपायांपासून दूर राहण्याची इच्छा असते, ते पापांपासून नेहमी दूर राहतात.
Tamil Transliteration
Noyellaam Noiseydhaar Melavaam Noiseyyaar
Noyinmai Ventu Pavar.