संसाराची असारता

Verses

Holy Kural #३३१
क्षणभंगुराला शाश्‍वत मानणे, यापरता दुसरा मूर्खपणा कोणता? या मोहांधतेपेक्षा दुसरे मोठे अज्ञान ते कोणते?

Tamil Transliteration
Nillaadha Vatrai Nilaiyina Endrunarum
Pullari Vaanmai Katai.

Explanations
Holy Kural #३३२
गावात तमाशा बघायला लोकांचे थवेच्या थवे क्षणात जमतात; परंतु थोडया वेळाने ते सारे परत जातात. त्याप्रमाणे वैभव येते नि ओसरतेही.

Tamil Transliteration
Kooththaattu Avaik Kuzhaath Thatre Perunjelvam
Pokkum Adhuvilin Thatru.

Explanations
Holy Kural #३३३
संपत्ती बुडबुडयाप्रमाणे आहे. तू संपत्तिमान झालास तर चिर-कल्याण-कारी गोष्‍टी करायला वेळ लावू नकोस.

Tamil Transliteration
Arkaa Iyalpitruch Chelvam Adhupetraal
Arkupa Aange Seyal.

Explanations
Holy Kural #३३४
काळ अगदी निरुपद्रवी दिसतो; परंतु मानवी जीवनाला अखंड कर्वतणारी कर्वत म्हणजे तो हा काळ.

Tamil Transliteration
Naalena Ondrupor Kaatti Uyir Eerum
Vaaladhu Unarvaarp Perin.

Explanations
Holy Kural #३३५
जिभेची जो बोबडी वळली नाही नि घशात घुरुघुरू सुरूझाले नाही; तोच सत्कृत्ये करण्याची त्वरा कर.

Tamil Transliteration
Naachchetru Vikkulmel Vaaraamun Nalvinai
Mersendru Seyyap Patum.

Explanations
Holy Kural #३३६
तो काल होता नि आज नाहीं. अशी स्थिती आहे. या जगातील आश्चर्यांतील आश्चर्य ते हेच.

Tamil Transliteration
Nerunal Ulanoruvan Indrillai Ennum
Perumai Utaiththuiv Vulaku.

Explanations
Holy Kural #३३७
दुसन्या क्षणाचीही आपणांस शाश्‍वती नसते; परंतु आपण किती दूरचा विचार करीत बसतो !

Tamil Transliteration
Orupozhudhum Vaazhvadhu Ariyaar Karudhupa
Kotiyum Alla Pala.

Explanations
Holy Kural #३३८
अंडे फोडून पाखरू बाहेर पडते, त्याप्रमाणे आत्मा नि शरीर यांचे प्रेम आहे.

Tamil Transliteration
Kutampai Thaniththu Ozhiyap Pulparan Thatre
Utampotu Uyiritai Natpu.

Explanations
Holy Kural #३३९
मृत्यू निद्रेप्रमाणे आहे; जीवन निद्रोत्तर जागृतीप्रमाणे आहे.

Tamil Transliteration
Urangu Vadhupolunj Chaakkaatu Urangi
Vizhippadhu Polum Pirappu.

Explanations
Holy Kural #३४०
या क्षुद्र शरीरात वस्ती करण्याची आत्म का बरे इच्छा करतो? त्याचे शाश्‍वत असे दुसरे घर नाही का?

Tamil Transliteration
Pukkil Amaindhindru Kollo Utampinul
Thuchchil Irundha Uyirkku.

Explanations
🡱