राजाचे गुण

Verses

Holy Kural #३८१
सैन्य, प्रजा, संपत्ती, मंत्री, मित्र नि किल्लोकोट या सहा वस्तू ज्याच्याजवल आहेत तो खरा राजसिंह.

Tamil Transliteration
Pataikuti Koozhamaichchu Natparan Aarum
Utaiyaan Arasarul Eru.

Explanations
Holy Kural #३८२
धैर्य, औदार्य, धूर्तता नि उत्साह हे चार गुण राजाजवळ नेहमी हवेत.

Tamil Transliteration
Anjaamai Eekai Arivookkam Innaankum
Enjaamai Vendhark Kiyalpu.

Explanations
Holy Kural #३८३
जे पृथ्वीवर सत्त गाजवतात, त्याच्याजवळ पुठील तीन गुणा असतात: १ सदैव सज्जता, २ विद्या, ३ प्रत्युत्पन्नमतित्व (झटपट निर्णय घेण्याची बुद्धी).

Tamil Transliteration
383 Thoongaamai Kalvi Thunivutaimai Immoondrum
Neengaa Nilanaan Pavarkku.

Explanations
Holy Kural #३८४
गुणहीन राजा काय कामाचा? राजाने अधर्माचे शासन करावे, स्वतःच्या यशाला प्राणांपेक्षा जपावे, क्षात्रधर्माविरुद्ध पाप त्याने करू नये.

Tamil Transliteration
Aranizhukkaa Thallavai Neekki Maranizhukkaa
Maanam Utaiya Tharasu.

Explanations
Holy Kural #३८५
आपल्या राज्यातील समृद्धी कशी वाषेल, आपला खजिना भरलेला कसा राहील, या गोष्‍टी राजाला माहीत हव्यात. त्याप्रमाणेच आपल्या संपत्तीला कसे जपावे, तिचा योग्य व्यय कसा करावा, हेही त्याला माहीत हवे.

Tamil Transliteration
Iyatralum Eettalung Kaaththalum Kaaththa
Vakuththalum Valla Tharasu.

Explanations
Holy Kural #३८६
ज्या राजाजवल प्रजेला जाता येते, जो सर्वांना प्राप्त आहे, जो गोड बोलतो, त्या राज्याच्या राज्याची इतर राज्यांपेक्षा सर्वत्र अधिक प्रशंसा होईल.

Tamil Transliteration
Kaatchik Keliyan Katunjollan Allanel
Meekkoorum Mannan Nilam.

Explanations
Holy Kural #३८७
जो उदारपणाने देतो नि प्रमाने राज्य करतो, अशा राजाची कीर्ती जगभर पसरते; जो प्रदेश ध्यावा असे त्याला वाटेल, तो तुआच्या सत्तेखाली येईल.

Tamil Transliteration
Insolaal Eeththalikka Vallaarkkuth Thansolaal
Thaankan Tanaiththiv Vulaku.

Explanations
Holy Kural #३८८
जो निष्पक्षपातीन्याय देतो नि प्रजापालन काळजीपूर्वक करतो. तो नरश्रेष्‍ठ म्हणून मानला जाईल, तो देवमाणूस होईल.

Tamil Transliteration
Muraiseydhu Kaappaatrum Mannavan Makkatku
Iraiyendru Vaikkap Patum.

Explanations
Holy Kural #३८९
ज्या राजाजवळ कटू बोलणेही शांतपणे ऐकून घेण्याचा गुण आहे, त्याच्या छत्रछायेच्या पाठोपाठ सारी प्रजा येईल, सारी प्रजा त्याच्या पाठीशी उभी राहील.

Tamil Transliteration
Sevikaippach Chorporukkum Panputai Vendhan
Kavikaikkeezhth Thangum Ulaku.

Explanations
Holy Kural #३९०
जो राजा उदार आहे, जो मनाचा मोठा आहे, जो प्रसन्न दिसतो, न्यायी असतो, जो प्रजेचे नीट पालन करतो, तो राजकुलदीपक होय. तो खरा राजमणी.

Tamil Transliteration
Kotaiyali Sengol Kutiyompal Naankum
Utaiyaanaam Vendhark Koli.

Explanations
🡱