निंदा करू नको

Verses

Holy Kural #१८१
जो अन्यायाने वागते, सदाचाराचे नावही जो कधी काढीत नाही, अशाही मणसाला उद्देशून "हा पाहा मनुष्य; हा कधी कोणाची त्याच्या पाठीमागे निंदा करीत नाही". असे जर कोणी म्हणाले तर ते ऐकून त्या माणसासही समाधान वाटते.

Tamil Transliteration
Arangooraan Alla Seyinum Oruvan
Purangooraan Endral Inidhu.

Explanations
Holy Kural #१८२
चांगले सोडून वाईट करणे म्हणजे चूकत; परंतु तोंडावर हसून मागे निंदा करणे हे मात्र फारच वाईट.

Tamil Transliteration
Aranazheei Allavai Seydhalin Theedhe
Puranazheeip Poiththu Nakai.

Explanations
Holy Kural #१८३
असत्याने नि परिनिंदेने जगण्यापेक्षा तत्काळ मरणे शतपटींनी बरे.

Tamil Transliteration
Purangoorip Poiththuyir Vaazhdhalin Saadhal
Arangootrum Aakkath Tharum.

Explanations
Holy Kural #१८४
एकाध्याने तुमच्या तोंदावर जरी तुमचा अपमान केला असला, तरी त्याच्या पाठीमागे तुम्ही त्याची निंदा करू नका.

Tamil Transliteration
Kannindru Kannarach Chollinum Sollarka
Munnindru Pinnokkaach Chol.

Explanations
Holy Kural #१८५
ओठावर धर्मवचने असली, तरी निंदाखेर जीभ हृदयाची क्षुद्रता प्रकट करतेच.

Tamil Transliteration
Aranjollum Nenjaththaan Anmai Puranjollum
Punmaiyaar Kaanap Patum.

Explanations
Holy Kural #१८६
तू दुसन्याची निंदा केलीस तर तोही तुझी सारी उणी पाहील; तुझे सारे किळसवाणे प्रकार तोही बाहेर काढील.

Tamil Transliteration
Piranpazhi Kooruvaan Thanpazhi Yullum
Thirandherindhu Koorap Patum.

Explanations
Holy Kural #१८७
निंदेतच आनंद मानणान्यांना मैत्री जोडण्याची मधुर कला अवगत नसते. त्यांचे जुने मित्रही त्यांच्या निंदेला विटून, कंटाळून त्यांना सोडून जातील.

Tamil Transliteration
Pakachchollik Kelirp Pirippar Nakachcholli
Natpaatal Thetraa Thavar.

Explanations
Holy Kural #१८८
मित्रांचे दोषही जगाला सांगण्यात ज्यांना आनंद वाटतो, ते शत्रूचे दोष कसे पाहणार नाहीत?

Tamil Transliteration
Thunniyaar Kutramum Thootrum Marapinaar
Ennaikol Edhilaar Maattu.

Explanations
Holy Kural #१८९
पाठीमागे निंदा करणान्यांचा भार धरित्रीला कसा बरे सहन होतो? केवल कर्तव्य म्हणूनच भूमाता हे करीत असेल.

Tamil Transliteration
Arannokki Aatrungol Vaiyam Purannokkip
Punsol Uraippaan Porai.

Explanations
Holy Kural #१९०
शत्रूच्या दोषांचे आविष्करण, पृयवकरण करता, त्याप्रमाणे स्वत:च्या दोषांचे निरीक्षण-परीक्षा कराल तर पाप जवळ येईल का?

Tamil Transliteration
Edhilaar Kutrampol Thangutrang Kaankirpin
Theedhunto Mannum Uyirkku.

Explanations
🡱