दुर्ग, किल्केलोट

Verses

Holy Kural #७४१
संरक्षणाच्या चिंतेत असणान्या दुर्बल राजांना दुर्ग साहाय्य देतातच; परंतु प्रबळांनाही त्यांच्यापासून मदत होतो.

Tamil Transliteration
Aatru Pavarkkum Aranporul Anjiththar
Potru Pavarkkum Porul.

Explanations
Holy Kural #७४२
नद्या, समुद्र, वाळवंटे, पर्वत, घनदाट जंगले, ही निरनिराळया तन्हेची संरक्षक साधनेच आहेत.

Tamil Transliteration
Manineerum Mannum Malaiyum Aninizhar
Kaatum Utaiya Tharan.

Explanations
Holy Kural #७४३
किल्ल्यांच्या बाबतीत उंची, जाडी, भक्कमपणा आणि अभेद्यपणा या चार गोष्‍टी लक्षात घेतल्या जातात, असे शास्त्र सांगते.

Tamil Transliteration
Uyarvakalam Thinmai Arumaiin Naankin
Amaivaran Endruraikkum Nool.

Explanations
Holy Kural #७४४
ज्याला फार थोडया जागी धोका आहे, पाडाव करू पाहणान्यांना जो पुरन उरतो, तो खरोखर अजिंक्य दुर्ग होय.

Tamil Transliteration
Sirukaappir Peritaththa Thaaki Urupakai
Ookkam Azhippa Tharan.

Explanations
Holy Kural #७४५
अभेद्यता, आतील सैन्याला स्वसंरक्षणाची शक्यता, आत भरपूर धान्यसामग्री व इतर सामान असणे, या गोष्‍टी किल्ल्याला आवश्यक आहेत.

Tamil Transliteration
Kolarkaridhaaik Kontakoozhth Thaaki Akaththaar
Nilaikkelidhaam Neeradhu Aran.

Explanations
Holy Kural #७४६
ज्यात सर्व प्रकारची सामग्री आहे, ज्याच्या रक्षणासाठी राजनिष्‍ठ लोक सिद्ध आहेत, जो चांगल्या तन्हेने तोंड देईल तोच खरोखर किल्ला होय.

Tamil Transliteration
Ellaap Porulum Utaiththaai Itaththudhavum
Nallaal Utaiyadhu Aran.

Explanations
Holy Kural #७४७
वेढा घालून, हल्ला करून किंवा दगलबाजी करून जो घेणे शक्य नाही, तोच खरोखर अजिंक्य किल्ला.

Tamil Transliteration
Mutriyum Mutraa Therindhum Araippatuththum
Patrar Kariyadhu Aran.

Explanations
Holy Kural #७४८
शत्रू अर्थ करीत असताही आतील सैन्य ज्यामुळे शत्रूला पराभूत करते तो खरा किल्ला होय.

Tamil Transliteration
Mutraatri Mutri Yavaraiyum Patraatrip
Patriyaar Velvadhu Aran.

Explanations
Holy Kural #७४९
विविध तटबंदी नि मान्याच्या जागा, यांमुळे जो दुर्ग अभेद्य केला गेला आहे, शत्रू दूर आहे तोच त्याची धुळदाण उडवायला जो स्वतःच्या सैनिकांना समर्थ करतो त्यालाच किल्ला म्हणावे.

Tamil Transliteration
Munaimukaththu Maatralar Saaya Vinaimukaththu
Veereydhi Maanta Tharan.

Explanations
Holy Kural #७५०
किल्ला कितीही अभेद्य नि बळकट असला तरी तेथील सैन्य जर दमदार नि शर्थाने लढणारे नसल तर काय उपयोग?

Tamil Transliteration
Enaimaatchith Thaakiyak Kannum Vinaimaatchi
Illaarkan Illadhu Aran.

Explanations
🡱