कृषी, शॆती

Verses

Holy Kural #१०३१
कोठेही गेलात तरी शेचटी अन्नासाठी नांगराच्या पाठीमागे उभे राहावे लागणारच. किती कष्‍ट पडले तरी शेवटी कृषी हाच सर्वोत्तम धंदा होय, प्रमुख धंदा होय.

Tamil Transliteration
Suzhandrumerp Pinnadhu Ulakam Adhanaal
Uzhandhum Uzhave Thalai.

Explanations
Holy Kural #१०३२
समाजावे आधारस्तंभ शेतकरी होत; शेत नांगरण्याची शक्‍ती नसल्यामुळे जे इतर धंदे करतात, त्यांचाही शेतकरीच आधार असतो.

Tamil Transliteration
Uzhuvaar Ulakaththaarkku Aaniaq Thaatraadhu
Ezhuvaarai Ellaam Poruththu.

Explanations
Holy Kural #१०३३
जमीन कसून जे राहतात, तेच खरोखर जगतात. बाकी सारी दुनिया त्याच्या पाठोपाठ येते नि मिंधेपणाची भाकर खाते.

Tamil Transliteration
Uzhudhuntu Vaazhvaare Vaazhvaarmar Rellaam
Thozhudhuntu Pinsel Pavar.

Explanations
Holy Kural #१०३४
ज्या राजाच्या राज्यात भरदार कणसांच्या छायेत शेते विसावा घेत असतात, त्या राजाच्या छत्रासमोर जगातील इतर राजांची छत्रे लवलेली दिसतील.

Tamil Transliteration
Palakutai Neezhalum Thangutaikkeezhk Kaanpar
Alakutai Neezha Lavar.

Explanations
Holy Kural #१०३५
शेती कर्य़्न जे भाकर खातात, ते स्वतःच्या पोटासाठी कधी याचना नाहीच करणार; उलट भिक्षा मागणान्याला कधीही नाही न म्हणता भिल्षा घातलील.

Tamil Transliteration
Iravaar Irappaarkkondru Eevar Karavaadhu
Kaiseydhoon Maalai Yavar.

Explanations
Holy Kural #१०३६
शेतकरी हात जोडून बसेल तर सर्व इच्छांचा त्याग करणान्या निरिच्छ लोकांसही जगणे जड जाईल.

Tamil Transliteration
Uzhavinaar Kaimmatangin Illai Vizhaivadhooum
Vittemen Paarkkum Nilai.

Explanations
Holy Kural #१०३७
जमीन नांगरून आत सूर्याची उष्‍णाता जाऊन एक शेर मातीचे वजन जर तॊ पावशेर करशील तर मूठभर खत न घालताही अपरंपार पीक येईल.

Tamil Transliteration
Thotippuzhudhi Kaqsaa Unakkin Pitiththeruvum
Ventaadhu Saalap Patum.

Explanations
Holy Kural #१०३८
नांगरण्यापेक्षा खताने जास्त फायदा होतो; आणि नीट तण काढाल तर पाटबंधान्यापेक्षाही अधिक फायदा होईल.

Tamil Transliteration
Erinum Nandraal Eruvitudhal Kattapin
Neerinum Nandradhan Kaappu.

Explanations
Holy Kural #१०३९
शेतांकडे न जाता मनुष्य जर घरीच बसेल तर त्याही शेते पत्‍नी रागावते त्याप्रमाणे रुसतील, रागावतील.

Tamil Transliteration
Sellaan Kizhavan Iruppin Nilampulandhu
Illaalin Ooti Vitum.

Explanations
Holy Kural #१०४०
"मला काही खायला नाही" असे जेव्हा आळशी म्हणतो, तेव्हा ही स्स्यश्यामल वसुंधरा, ही धरणीमाता स्वतःजवळ हसते.

Tamil Transliteration
Ilamendru Asaii Iruppaaraik Kaanin
Nilamennum Nallaal Nakum.

Explanations
🡱