अहंकारी मूर्खपणा
Verses
व्यवहारज्ञानाचा अभाव हे ख्रे दारिद्र्य; दुसन्या दारिद्र्याला जग दारिद्रय समजत नाही.
Tamil Transliteration
Arivinmai Inmaiyul Inmai Piridhinmai
Inmaiyaa Vaiyaa Thulaku.
मूर्खाने आपण होऊन देणगी दिली, तर देणगी मिळणान्याचे अशीक म्हणायचे, दुसरें काय?
Tamil Transliteration
Arivilaan Nenjuvandhu Eedhal Piridhiyaadhum
Illai Peruvaan Thavam.
शत्रूसुद्धा आणणार नाही अशी संकटे आपल्या हातांनी मूर्ख आपल्यावर ओढवून घेतो.
Tamil Transliteration
Arivilaar Thaandhammaip Peezhikkum Peezhai
Seruvaarkkum Seydhal Aridhu.
'मी मोठा शहाणा' असे म्हणण्यात जितकी उथळ बुद्धी आहे, तितकी कोठेच दिसणार नाही.
Tamil Transliteration
Venmai Enappatuva Thiyaadhenin Onmai
Utaiyamyaam Ennum Serukku.
नसलेले ज्ञान स्वतःजवळ आहे, असे सांगणारा मूर्ख, स्वतःजवळ असलेल्या ज्ञानाविषयीही अस्स्शंकता निर्मितो.
Tamil Transliteration
Kallaadha Merkon Tozhukal Kasatara
Valladhooum Aiyam Tharum.
मनोबुद्धीची कुरूपता जर पदोपदी प्रकट होत असेल तर शरीर शृंगारून काय फायदा?
Tamil Transliteration
Atram Maraiththalo Pullarivu Thamvayin
Kutram Maraiyaa Vazhi.
गुप्त गोष्ट स्वतःजवळ न राखू शकणारा उथळ आणि उतावीळ मनुष्य स्वतःवर मोठी संकटे ओढून आणील.
Tamil Transliteration
Arumarai Sorum Arivilaan Seyyum
Perumirai Thaane Thanakku.
जो दुसन्याचा चांगला सल्ला ऐकत नाही, आणि चांगले काय हे कळण्याची ज्याला अक्कल नाही, तो मरेपर्यत स्वजनांना दुःख मात्र देत राहणार.
Tamil Transliteration
Evavum Seykalaan Thaandheraan Avvuyir
Poom Alavumor Noi.
मूर्खाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करणारा मूर्ख होय; कारण मूर्ख एकाच दृष्टिकोनाने बघतो आणि तेच बरोबर, असे त्याला वाटत असते.
Tamil Transliteration
Kaanaadhaan Kaattuvaan Thaankaanaan Kaanaadhaan
Kantaanaam Thaankanta Vaaru.
सारे जग ज्या गोष्टी मानते, त्याही नाकारणारा मनुष्य पृथ्वीवरचा मूर्तिमंत सैतान होय.
Tamil Transliteration
Ulakaththaar Untenpadhu Illenpaan Vaiyaththu
Alakaiyaa Vaikkap Patum.